महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Draupadi Murmu In Goa : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची गोव्यात भाजपच्या आमदार खासदारांसोबत बैठक - Union state Minister Shripad Naik

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यामुळे, गोव्यातील सर्व आमदार व खासदार तसेच विरोधकांनीही आपल्या उमेदवाराला सपोर्ट करावा अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant )यांनी केली आहे. तसच मोठ्या मताधिक्य मुर्मू यांना मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Draupadi Murmu In Goa
द्रौपदी मुर्मू गोव्यात दाखल

By

Published : Jul 14, 2022, 2:24 PM IST

गोवा -एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) आज गोव्यात ( Draupadi Murmu In Goa ) दाखल झाल्यात. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजप व सहयोगी गटाच्या आमदारांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे . मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, राज शिष्टाचार व वाहतूक मंत्री म्हवहिन गुदिनो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Union state Minister Shripad Naik ) यांच्यासोबत भाजपचे सर्व आमदार खासदार व सहयोगी गटाचे आमदारही या बैठकीला उपस्थित आहेत ( meeting with BJP MPs and MLAs ).

द्रौपदी मुर्मू गोव्यात दाखल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यामुळे, गोव्यातील सर्व आमदार व खासदार तसेच विरोधकांनीही आपल्या उमेदवाराला सपोर्ट करावा अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. तसच मोठ्या मताधिक्य मुर्मू यांना मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

दुपारी मुंबईत होणार दाखल - एनडीएच्या राष्ट्रपती पदाचा उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) हे विमानतळावर जाणार आहेत. त्यानंतर विमानतळ परिसरात असलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाच्या सर्व आमदार त्यांची भेट घेणार आहेत.

कर्नाटक दैारा -NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काल YSRCP खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. मंगळागिरी येथील एका सभागृहात दुपारी तासभर ही बैठक होणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ( CM Jagan Mohan Reddy ) यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडेल. YSRCP ने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NTA उमेदवार मुरमुक यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आहे. त्या दुपारी 2.45 वाजता गन्नावरम विमानतळावर ( Gannavaram Airport ) पोहोचतील आणि तिथून त्या मंगलगिरीच्या फंक्शन हॉलमध्ये दाखल होतील. मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू असतील.

हेही वाचा -Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, आज होणार मंत्रिमंडळाची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details