महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ncp Leader Nawab Malik : नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीसंदर्भातील वक्तव्याचा नवाब मलिकांनी घेतला समाचार, म्हणाले...'फडणवीस घराणेशाहीचंच प्रॉडक्ट' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे घराणेशाहीवरील भाष्य

गोव्यात प्रचारासाठी आलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ( Ncp Leader Nawab Malik hits out at Pm Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविषयीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. गोव्याचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस हे घराणेशाहीचंच प्रॉडक्ट असल्याचे मलिक यांनी म्हटलं.

Ncp Leader Nawab Malik
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

By

Published : Feb 10, 2022, 5:09 PM IST

पणजी - उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये ( Five States Assembly Elections ) विधानसभा निवडणुकीसाठी आज 10 फेब्रुवारीपासून मतदानाचे टप्पे पार पडत आहेत. सत्तेत येण्यासाठी सर्वंच पक्षांकडून निवडणूक प्रचारांचा धुराळा उडत आहे. गोव्यात प्रचारासाठी आलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ( Ncp Leader Nawab Malik hits out at Pm Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविषयीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

पंतप्रधान मोदी हे काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करतात. आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, असं म्हणतात. पण उत्तर प्रदेशात भाजपाने 56 राजकीय घराणेशाहीतील लोकांना तिकीट दिले आहे. या सर्व उमेदवारांच्या घरातील कोणी ना कोणी यापूर्वी राजकारणात होते. त्यामुळे त्यांना घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही हक्क नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटलं. ते आज सकाळी गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच एवढंच कशाला गोव्याचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीचंच प्रॉडक्ट असल्याचे मलिक यांनी म्हटलं.

बाबुश मोंसरात आणि विश्वजित राणे यांना आणि त्यांच्या बायकांना कोणत्या धर्तीवर तिकीट दिले, याचे उत्तरही मोदी यांनी द्यावे असे मलिक म्हणाले. सोबतच त्यांनी भाजपा आणि मोंसरात याना टार्गेट करत भाजपाने उत्पल पर्रीकर यांना डावलून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबुश मोंसरात याना तिकीट दिले. त्यामुळे बाबुश यांनी कोणत्या गंगेत अंघोळ केली आणि ते शुद्ध झालेत, असा सवालदेखील मलिक यांनी उपस्थित केला. दरम्यान केंद्र सरकार राज्यात ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असून बिगर भाजपाशासित याचा प्रामुख्याने वापर करत असल्याचाही आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

काय म्हणाले होते मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एनएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ‘घराणेशाहीचा लोकशाहीला सर्वांत मोठा धोका आहे. घराणेशाहीमुळे युवक राजकारणात येण्यापासून रोखले जात आहेत. सार्वजनिक जीवनात येण्यास युवक घाबरत आहेत’, असे मोदी (Narendra Modi) मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. तसेच काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पक्षातील इतर गुणवंतांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल, हरियाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांमधील घराणेशाहीवर बोट ठेवले होते.

पाच राज्यांतील निवडणुकांची तारीख -

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याबरोबर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

कोणत्या राज्यात किती जागा?

उत्तर प्रदेश- 403 जागा

पंजाब - 117 जागा

उत्तराखंड 70 जागा

मणिपुर - 60 जागा

गोवा - 40 जागा

हेही वाचा -Goa Assembly Election 2022 : बडे नेते सपत्नीक मैदानात, गोव्यातील घराणेशाहीवर ईटीव्हीचा विशेष रिपोर्ट...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details