पणजी - सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नारकोटिक्स कॅट्रोल ब्युरोने मुंबईसह देशभरात धाडी टाकण्यास सुरुवात केली. त्यात गोव्याचाही समावेश आहे. याप्रकरणात अनेक बॉलीवूड कनेक्टिव्हिटी जोडली गेली होती. ‘एनसीबी’ने छापा टाकून बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची मैत्रीण असलेल्या गॅब्रिएला दिमेत्रीयाडीसचा भाऊ ऑगिसिलाओस याच्यासह चौघांना गोव्यात अटक केली. त्यांच्याकडून चरसही जप्त करण्यात आला आहे. शिवोली परिसरात ही कारवाई झाली.
अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भावाला अटक -
गोवा आणि अमली पदार्थ यांचे वेगळे नाते आहे. गोव्यात येणारे अनेक देशीविदेशी पर्यटक सरहासपणे अमली पदार्थ सेवन करत असतात. आज संध्याकाळी शिवोलीत अर्जुन रामपाल मैत्रीण असलेल्या गॅब्रिएला दिमेत्रीयाडीसचा भाऊ ऑगिसिलाओस याच्यासह चौघांना गोव्यात अटक केली. उत्तर गोव्यातील शिवोली भागात ही कारवाई करत त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.