पणजी -15 ऑगस्ट 1947 साली देश स्वातंत्र झाला. मात्र, गोव्याला स्वातंत्र्य मिळायला (Goa liberation Day) तब्बल 14 वर्ष लागली. गोव्याच्या स्वातंत्रसैनिकांनी दिलेल्या बलिदानाने गोवा मुक्त झाला आहे. त्यामुळेच या स्वातंत्रसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते 60 व्या गोवा मुक्तीसंग्राम कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदी गोव्यात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा मुक्तीसंग्राम कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल (Prime Minister Narendra Modi Goa Tour) झाले होते. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
शाहिदाना वाहिली श्रद्धांजली
गोव्यात दाखल होताच मोदींनी आझाद मैदानात जाऊन गोवा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या व बलिदान दिलेल्या शाहिदाना श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी त्यांना तिन्ही दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली होती.
मिरामार किनाऱ्यावर नौदल व वायुदलाचे संचालन देशाच्या इतिहासात प्रथमच गोवा राज्याच्या 60 व्या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नौदल व वायुदलाच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समुद्र व आकाशातून मानवंदना दिली. या संचालनामध्ये सहभागी झालेल्या सर्व बोटी, लढाऊ विमाने, जहाजे ही भारतीय बनावटीची होती. सरदार वल्लभभाई पटेल असल्यास गोवा लवकर मुक्त झाला असता
पोर्तुगीजांच्या जुलमी राजवतीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासह देशभरातील अनेक स्वातंत्रसैनिक व गोव्यातील जनतेने फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच योगदानामुळे भारत देश स्वातंत्र होऊन तब्बल 14 वर्षांनी गोवा मुक्त झाला. मात्र, त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल असते तर गोवा आधीच मुक्त झाला असता असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी पणजीत श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये जनतेला संबोधित केले होते.
मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे
गोवा मुक्तीदिनाच्या 60 व्या वर्षानंतर गोवा विकासाची नवी वाटचाल करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोव्याला उशिरा स्वातंत्र मिळाले. मात्र, गोवेकर मधल्या काळात परकीय शत्रूंसमोर झुकले नाहीत. त्यांनी आपला लढा चालूच ठेवला, व विजय मिळवला.
गोवा प्रत्येक क्षेत्रात एक नंबर वर
गोव्याच्या विकासात , समृद्धी त मनोहर परिकर यांचा सिहांचा वाटा आहे, त्यांनी आपल्या अंतापर्यंत गोव्याच्या विकासाचा मार्ग रुंदावत नेला, आणि त्यांचे कार्य आता डॉ प्रमोद सावंत करीत आहेत. पर्यटन, फिल्म फेस्टिवल, 100 टक्के कोविड लसीकरण यामुळे गोव्याचे नाव जगाच्या व देशाच्या नकाशावर आहे. गोव्याच्या तरुणाच्या व्यापक स्वप्नांना आकार देण्यासाठी मुख्यमंत्री विविध उपक्रम राबवितात. मोदींच्या हस्ते विकास प्रकल्पांचे लोकार्पण
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण करण्यात आलेला अगवाद किल्ला व म्युझियम, मोपा एअर पोर्ट वरील विकास कौशल्य स्कूल, गोवा वैद्यकीय महाविद्यालय च्या सुपर स्पेशालिटी ब्लॉक व दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा केला.
स्वातंत्र सैनिक व स्वयंपूर्ण मित्रांचा सन्मान