महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात सरावादरम्यान 'मिग-29' लढाऊ विमान कोसळले; वैमानिक सुखरुप - MIG 29 crash

गोव्यात सरावादरम्यान 'मिग-29' हे रशियन बनावटीचे  लढाऊ विमान कोसळ्याची घटना समोर आली आहे. सरावादरम्यान संबंधित प्रकार घडला असून, विमानातील दोन्ही वैमानिकांना सुखरुप बाहेर पडण्यात यश आले आहे.

गोव्यात 'मिग-29' लढाऊ विमान कोसळले

By

Published : Nov 16, 2019, 1:18 PM IST

Updated : Nov 16, 2019, 1:24 PM IST

पणजी - गोव्यात सरावादरम्यान 'मिग-29' हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. सरावादरम्यान संबंधित प्रकार घडला असून, विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. मडगाव पासून काही अंतरावर असलेल्या लोटली या गावात संबंधित मिग-29 कोसळले आहे.

विमानांच्या लढाऊ श्रेणीतील मिग-29 कोसळण्याच्या या आधीही अनेक घटना झाल्या असून याला 'फ्लाइंग कॉफिन' असेही संबोधतात.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनाही विमान कोसळल्याची माहिती मिळाली असून, दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. तसेच हवाई दलाचे अधिकारी अधिक माहिती घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Last Updated : Nov 16, 2019, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details