महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Michael Lobo : विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबोंची हकालपट्टी; माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांवर कारवाई - मायकल लोबो दिगंबर कामत यांचे बंड

काँग्रेसने गोवा विधानसभाचे ( Goa Assembly ) विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Opposition leader Michael Lobo ) यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले आहे. मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपशी संबंध ठेवून पक्षाविरुद्ध कट रचत होते त्यांच्यावर कारवाई करणार असे दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केले आहे.

Michael Lobo
मायकल लोबो यांची हकालपट्टी

By

Published : Jul 10, 2022, 9:34 PM IST

Updated : Jul 10, 2022, 10:31 PM IST

पणजी - काँग्रेसने गोवा विधानसभाचे ( Goa Assembly ) विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Opposition leader Michael Lobo ) यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ( Rebellion of Michael Lobo Digambar Kamat ) यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आता गोव्यातही अशीच परिस्थिती ऐकायला मिळत आहे. रविवारी दिवसभर काँग्रेस आमदारांची मोठी गटबाजी फोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू होती. आमदारांच्या पक्षांतराच्या धुमश्चक्रीत दिनेश गुंडू राव यांनी गोव्यात पोहोचून आमदारांची बैठक घेतली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, मायकल लोबो यांची गोव्यातील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबोंची हकालपट्टी

मायकल लोबो, दिगंबर कामत यांची बंडखोरी -काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव ( AICC Goa ) यांनी आरोप केला की भाजपला विरोध संपवायचा आहे. आमच्या काही नेत्यांनी भाजपसोबत गोव्यात काँग्रेस पक्ष कमकुवत आणि पक्षांतराचा डाव रचला होता. या कटाचे नेतृत्व आपलेच दोन नेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी केले. मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपशी संबंध ठेवून पक्षाविरुद्ध कट रचत होते त्यांच्यावर कारवाई करणार असे दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षांतर करणाऱ्यांवर कारवाई -एआयसीसी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, दिगंबर कामत आणि मायकल लोबो भाजपसोबत काम करत होते. दिगंबर कामत यांच्यावर अनेक खटले असल्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी असे केल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतर करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. बघू किती लोक तिकडे जात आहेत. गोव्यात लवकरच नविन नेत्याची निवड केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

कोण आहेत मायकल लोबो? -मायकल लोबो हे सध्या गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 2012 - 2022 पर्यंत ते भाजप सरकारमध्ये मंत्री होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप आमदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री पदाची आशा असलेले लोबो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय ताकद वापरून आपल्या पत्नीसह आपल्या दोन समर्थक आमदारांना निवडून आणले होते. जर राज्यात काँग्रेसला बहुमताचा आकडा प्राप्त झाला असता तर मायकल लोबो हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांच्या या सर्व आकांक्षावर पुरते पाणी फिरले. सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

उपसभापती निवडीची अधिसूचना रद्द - गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी उपसभापती निवडीसाठी जारी केलेली अधिसूचना रद्द केली आहे. 12 जुलै रोजी निवडणूक होणार असताना रविवारी सकाळी ही अधिसूचना मागे घेण्याचे आदेश जारी करण्यात आले. विधानसभेच्या सचिव नम्रता उलमान यांनी सांगितले की, उपसभापती निवडीची अधिसूचना नियम ३०८ अंतर्गत ८ जुलै रोजी जारी करण्यात आली होती.

नाराज आमदार एकत्र -काँग्रेसचे आमदार अलेक्सिओ सिक्वेरा म्हणाले की, काही असंतुष्ट काँग्रेस आमदारांची नुकतीच मडगाव येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मला या बैठकीला हायकमांडने बोलावले नव्हते. या बैठकीला कोण उपस्थित होते याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेसचे किमान सात नाराज आमदार रणनीती आखण्यासाठी एका हॉटेलमध्ये भेटले. दरम्यान, गोवा विधानसभेच्या अध्यक्षांनी मंगळवारी होणारी उपसभापतीची निवडणूक पुढे ढकलली आहे. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेसचे सध्या 11 आमदार आहेत. यापैकी सुमारे आठ जण सत्ताधारी भाजपमध्ये दाखल झाल्याच्या अफवा आहेत.

हेही वाचा -Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरुन शरद पवारांनी झटकले हात; म्हणाले, 'याची कल्पना...'

Last Updated : Jul 10, 2022, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details