पणजी - सध्या अस्तित्वात असलेल्या लॉकडाऊन 4 मध्ये 15 दिवसांची वाढ होऊ शकते, असा संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरुन बोलल्यानंतर सावंत यांनी सांगितले.
शुक्रवारी पर्यटन मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त पणजी येथे पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, गोव्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, मॉल्स आणि जिमच्या ठिकाणी सोशल डिस्न्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी अशीच सुरू होईल.
"काल(गुरुवारी) मी अमित शहाजींशी दूरध्वनीवरून बोललो. सध्या राज्यातील लॉकडाउन आणखी 15 दिवस चालू राहिल असे दिसते," असे सावंत म्हणाले. देशातील कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्य असल्याचे त्यांना वाटते.
गोवा येथील रेस्टॉरंट्स, मॉल्स, जिम आणि हॉटेल पुन्हा सुरू करण्याची मागणी होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने केंद्रीय सामाजिक व्यवहार मंत्रालयाला योग्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन याची अंमलबजावणी करु शकतो, अशी विनंती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
"गोव्यामध्ये रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, मॉल्स, जीम वगळता बहुतेक उपक्रम सुरू झाले आहेत. आमचा विश्वास आहे की कमीतकमी रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि व्यायामशाळा सामाजिक अंतराच्या मानदंडांसह सुरू केल्या पाहिजेत. आम्ही गृहमंत्रालयाला औपचारिकपणे माहिती देऊ. त्यांच्याकडून उद्यापर्यंत मार्गदर्शक सूचना येऊ शकतात," असेही सावंत म्हणाले. गोवा राज्यामध्ये कोरोना व्हायरसची बाधा झालेले ३१ रुग्ण सक्रिय आहेत.