महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात 'मसाला उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' परिसंवाद उत्साहात - आयसीएआर गोवा

'मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' यावर आधारित दोन दिवसीय परिसंवाद आयसीआर गोवा येथे पार पडला.

goa
गोव्यात 'मसाला उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' परिसंवाद पडला पार

By

Published : Jan 23, 2020, 12:33 PM IST

पणजी- 'मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' यावर आधारित दोन दिवसीय परिसंवाद आयसीआर गोवा येथे पार पडला. आयसीएआर-केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्थेने कोझीकोड केरळ येथील भारतीय मसाला संशोधन संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गोव्यात 'मसाला उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' परिसंवाद पडला पार

हेही वाचा -मनसेची 'शिवराजमुद्रा', राज ठाकरेंच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावरण

उद्घाटन सोहळ्याला आयसीएआरचे माजी उपमहासंचालक (नि.) डॉ. जे. सी. कटीयाल, भारतीय मसाला संशोधन संस्था कोझीकोडचे संचालक डॉ. के. निर्मल बाबू, गोवा सरकारच्या कृषी संचालक माधव केळकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, आयसीएआर गोव्याचे संचालक डॉ. एकनाथ चाकुरकर, सुपारी आणि मसाला विकास संचालनालय केरळचे डॉ. होमी चेरियन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. कटीयाल म्हणाले, मसाले उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताची पारंपरिक ओळख आहे. आता कालानुरूप समाला उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्पर्धेच्या युगात आपला ठसा उमटवण्याची आवश्यकता आहे. मसाला पिकांसाठी पोटँशियमची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. पोटँशियम आयातीवर आपला खूप खर्च होतो. हा खर्च टाळण्याकरिता त्याला पर्याय म्हणून ग्लुकोनाईट वापरले पाहिजे. ग्लुकोनाईट पोटँशियम एवढेच कार्यक्षम असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यात ग्लुकोनाईट मोठ्या प्रमाणात सापडते. त्याबरोबरच प्रयोगशाळांमध्ये संशोधन करताना संशोधकांनी शेतकऱ्यांची गरज काय आहे, याला प्राधान्य दिले पाहिजे.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले, कोकण आणि गोव्यात मसाला शेती नैसर्गिक पद्धतीने होते. त्यामध्ये थोडा बदल करून उत्पादनात वाढ केली जाऊ शकते. तसेच शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हवामान बदलाचा मसाला पिकांवर.कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मसाला शेती ही उत्तम आहे. मसाला संशोधनासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ते महत्वाचे आहे. कारण आपल्याकडे मसाला पिके भरपूर आहेत. पण त्याची माहिती नाही.

डॉ. चेरियन म्हणाले, हळदीचे उत्पादन आणि निर्यात यामध्ये भारताला मोठी संधी आहे. देशातून दरवर्षी 1 लाख 30 हजार टन हळद निर्यात केली जाते. त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून जागतिक स्तरावर अधिकाधिक बाजारपेठ काबीज करण्याची भारताला संधी आहे.

आयसीएआर गोव्याचे संचालक डॉ. चाकुरकर यांनी प्रास्ताविक करताना परिसंवादाची रुपरेषा स्पष्ट केली. उद्घाटन सत्रात महाराष्ट्र, गोवा आणि केरळमधील मसाले उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यामध्ये नवजात शेळीच्या पिलाची काळजी आणि व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details