महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : उत्पलचे बंड शमविण्यात भाजपा अयशस्वी.. 'बंडोबां'मुळे पक्षाची डोकेदुखी वाढली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी (Utpal parrikar revolt)भाजपला मोठा धक्का दिला असून त्यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election 2022) उत्पलपाठोपाठ माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही बंडाचा पावित्रा घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Jan 22, 2022, 5:42 PM IST

goa election 2022
goa election 2022

पणजी (गोवा) -गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी (Utpal parrikar revolt)भाजपला मोठा धक्का दिला असून त्यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election 2022) उत्पलपाठोपाठ माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही बंडाचा पावित्रा घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर करताच अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट न मिळाल्याने आपली वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे.

उत्पल पर्रिकर आणि पार्सेकर अपक्ष लढवणार -
पणजीतून भाजपतर्फे उमेदवारी न मिळाल्यामुळेउत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत उत्पल परिकरयांनी आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होताच पर्रिकर यांनी काँग्रेसतर्फे तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी महापौर उदय माडकाईकर यांची शनिवारी दुपारी भेट घेऊन आपणास पाठिंबा देण्याची मागणी केली. दरम्यान पर्रिकर यांच्या मागणीला माडकाईकर यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर पार्सेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

'बंडोबां'मुळे पक्षाची डोकेदुखी वाढली
फडणवीस पर्रिकरांचे बंड शमविण्यात अयशस्वी -
भाजपने पर्रिकर यांना बिचोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. शुक्रवारपर्यंत हा मतदारसंघ त्यांच्यासाठी राखीवही ठेवण्यात आला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतूनच निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही पर्रिकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस यांनी शनिवारी सकाळी बाबुश मोंसरात व उत्पल पर्रिकर यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी एक विशेष बैठक बोलावली होती. मात्र उत्पल आपल्या निर्णयांवर ठाम राहून या बैठकीस येण्याचे टाळले. दरम्यान याविषयी आम्ही फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याविषयावर बोलणे टाळले.
माजी मुख्यमंत्री पार्सेकरही बंडाच्या पवित्र्यात -
दरम्यान मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी 2019 ला भाजपवासी झालेल्या आमदार दयानंद सोपटे याना तिकीट दिले आहे. त्यामुळे पार्सेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पार्सेकर, पर्रिकर हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे बंडखोर उमेदवार यांच्या बाबतीत पक्ष योग्य तोच निर्णय घेणार आहे. तसेच येणाऱ्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नरेंद्र सावाईकर यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.
पावसकर आणि फर्नांडिझ यांच्याबाबत विजयाची अपेक्षा कमी -
दीपक पाऊसकर आणि ईझींदोर फर्नांडिझ हे 2019 चे आयात उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या बाबतीत भाजपला शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपने त्यांचा पत्ता कट केला.
पाटनेकर निवडणूक लढविणार -
भाजपने बिचोली मतदारसंघात अद्याप उमेदवार घोषित केला नव्हता. मात्र ही जागा उत्पल पर्रिकर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र पर्रिकर यांनी पणजीच्या जागेसाठी हट्ट धरला होता, मात्र भाजपने येथे बाबुश मोंसरात यांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या बिचोली मतदारसंगातून विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर निवडणूक लढविणार आहेत, तशी घोषणा शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details