महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर, अज्ञातांनी उखडले बॅनर, फासले काळे

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या डोक्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतांनी पाय देऊन उभे असल्याचे कार्टून्स व्हायरल केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने ममतांच्या जाहिरातीचे बॅनर उखडून टाकत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावरून राज्यात राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे.

Mamata Banerjee on Goa Visit
ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; अज्ञातांनी उखडले बॅनर

By

Published : Oct 28, 2021, 11:55 AM IST

Updated : Oct 28, 2021, 12:20 PM IST

पणजी - अवघ्या दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील राजकारणात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जीने भाजपला राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे. आजपासून त्या दोन दिवसीय गोव्या दौऱ्यावर आहेत. तृणमूलने महिनाभरापासून मोक्याच्या ठिकाणी राजकीय बँनेरबाजी करत गोयंची नवी सकाळ मोहिमेला सुरुवात करून गोव्याचे लक्ष वेधून घेतले होतं. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या करिअरची नवी सकाळ सुरू करून घेण्यासाठी तृणमूलचा रस्ता धरला होता. त्यामुळे राज्यात बऱ्यापैकी तृणमूलची पक्ष विस्तारणी सुरू झाली होती.

कार्टूनवरून नवा वाद
मोदी, शाह आणि सावंतांच्या डोक्यावर ममतांचा पाय -


तृणमूलने नुकतेच एक कार्टून्स प्रसारित केले होते. त्यात ममता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या डोक्यावर पाय ठेवल्याचे दिसत होते. तर आपण गोव्याच्या राजकारणात उतरत आहोत, तुम्हाला काय करायचे ते करा, असा संदेश त्यातून प्रसारित करण्यात आला होता.

भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर -


या कार्टूनवर गोवा भाजपाने जोरदार प्रत्युत्तर देत ममतांचा सुरू होणारा राजकीय दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. तत्पुर्वी राज्यात लावलेली बॅनर अज्ञातांनी उखडून टाकत ममतांच्या तोंडाला काळे फसण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही तृणमुलला सूचक इशारा देत आपणही जशास तसे उत्तर देणार असल्याचे म्हटलं.

तृणमूल काँग्रेस आणि भाजपात राजकीय चिखलफेक

ते कार्टून्स आमचे नाहीच - तृणमुल काँग्रेस

राज्यात बॅनर बाजी व कार्टून्सवर राजकीय वातावरण तापत असताना तृणमुल काँग्रेसने पत्रकार परिषदेत ते कार्टून्स आपण प्रसिद्ध न केल्याचा दावा केला आहे.


ममता बॅनर्जी गुरुवारपासून गोवा दौऱ्यावर -


राज्यात तृणमुलचा प्रवेश झाल्यावर प्रथमच ममता बॅनर्जी गुरुवापासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येत आहेत.

हेही वाचा -गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रचलं 'हे' कारस्थान

Last Updated : Oct 28, 2021, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details