महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात रात्रीच्या वेळी जास्त अपघात हे दारू पिऊनच होतात - मुख्यमंत्री - goa cm pramod sawant

गोव्यात रात्रीच्या वेळी पार्ट्या करून अनेक पर्यटक व नागरिक घरी परतत असतात, अशावेळी भरधाव वेगाने गाड्या चालवणे, तसेच दारू पिऊन गाडी चालवणे असे प्रकार घडत असतात त्यात अनेक गाड्यांना धक्का देणे, ठोकर देणे अशा घटनाही राज्यात वाढत चालले आहेत. त्यामुळे पर्यटक डेस्टिनेशन असणाऱ्या राज्यात पार्ट्यांबरोबर अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.

गोव्यात रात्रीच्या वेळी जास्त अपघात हे दारू पिऊनच होतात - मुख्यमंत्री
गोव्यात रात्रीच्या वेळी जास्त अपघात हे दारू पिऊनच होतात - मुख्यमंत्री

By

Published : Jul 30, 2022, 9:52 PM IST

पणजी -गोव्यात रात्रीच्या वेळी ट्रक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच हे अपघात रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितलं. गुरुवारी अशाच एका अपघातात जुवारी पुलावरून चारचाकी नदीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता. गोव्यात रात्रीच्या वेळी ट्रक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यातच हे अपघात रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं. गुरुवारी अशाच एका अपघातात जुवारी पुलावरून चारचाकी नदीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता.

ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे रात्रीच्या अपघातात वाढ -राज्यात बहुतांश अपघात हे दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे तसेच गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे होत असून अशा अपघातांना आळा घालण्यासाठी व हे अपघात होऊ नये यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करणार असल्याचेहि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

राज्यात पार्ट्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले -गोव्यात रात्रीच्या वेळी पार्ट्या करून अनेक पर्यटक व नागरिक घरी परतत असतात, अशावेळी भरधाव वेगाने गाड्या चालवणे, तसेच दारू पिऊन गाडी चालवणे असे प्रकार घडत असतात त्यात अनेक गाड्यांना धक्का देणे, ठोकर देणे अशा घटनाही राज्यात वाढत चालले आहेत. त्यामुळे पर्यटक डेस्टिनेशन असणाऱ्या राज्यात पार्ट्यांबरोबर अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.

गुरुवारी पार्टी होऊन परतत असताना चौघांचा झाला होता मृत्यू -गुरुवारी रात्री दक्षिण गोव्यातून आगाशी वाढदिवसाची पार्टी करुन घरी येत असताना चौघांचा अपघातात मृत्यू झाला होता. हे सर्वजण एका बर्थडे पार्टी करुन घरी परतत असताना रात्री एकच्या सुमारास हा अपघात घडला. यात त्यांची चार चाकी भरधाव वेगात असताना, गाडी झुवारि नादिवरील पुलाचा कठडा तोडून थेट नदीत पडली यातच त्या चौघांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details