पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे ( Goa Assembly Elections 2022 ) मतदान आज होत आहे. प्रत्येक पक्षाने गोव्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या प्रचारतोफा थंडावल्या असून सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करतील, जाणून घेऊया.
Goa Assembly Election : गोवा विधानसभा मतदान; कोणते नेते कुठे करणार मतदान, जाणून घ्या...
गोवा विधानसभा निवडणुकीचे ( Goa Assembly Elections 2022 ) मतदान आज होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करतील, जाणून घेऊया.
Goa Assembly Elections 2022
कोणते नेते कुठे करणार मतदान-
- केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक सकाळी 10 वाजता पणजी विधानसभा मतदारसंघातील रायबंदर येथील सापेंद्र सरकारी प्राथमिक विद्यालयातील बूथ नंबर 1मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
- हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर सकाळी 7 वाजता बायणा-वास्को येथील माता उच्च माध्यमिक विद्यालयातील बूथ क्रमांक 7वर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
- राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई सकाळी 7 वाजता दोनापावल येथील सरकारी शाळेतील बूथ क्रमांक 15मध्ये पत्नी रीटा यांच्यासह आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत सकाळी 9 वाजता कोठंबी-पाळी येथील सरकारी प्राथमिक शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
- तर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत सकाळी 11.30 वाजता मडगाव येथील आदर्श विद्या विकास विद्यालयात मतदानाचा हक्क बजावतील.
Last Updated : Feb 14, 2022, 6:38 AM IST