महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे  शास्त्रज्ञ घडावेत - मुख्यमंत्री सावंत - उद्घाटन

मिरामार येथे गोवा विज्ञान केंद्रात 'इनोव्हेशन हब' चे उद्घाटन करण्यात आले असून इयत्ता 5 वी ते 12 वी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुलांना प्रयोगशाळेतील साहित्य हाताळण्याची संधी मिळणार आहे.

गोव्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ घडावेत

By

Published : Jul 1, 2019, 10:28 PM IST

गोवा - राज्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ घडावेत, अशी इच्छा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. मिरामार येथे गोवा विज्ञान केंद्रात सुरू करण्यात आलेल्या 'इनोव्हेशन हब' (नवप्रवर्तन हब) च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणाकोणाला शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे, असा प्रश्न करत उपस्थित विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच विज्ञानाशी संबंधित सर्व विषयांना येथे प्रत्यक्ष आणि आवश्यक तितका वेळ हाताळा, असे आवाहन करतानाच शिक्षण खात्याशी बोलून सर्व विद्यार्थ्यांना 'इनोव्हेशन हब' ला भेट देता येईल, असे आयोजन करण्याच्या सूचन देऊ, असे आश्वासनही दिले.


पुण्यातील डेक्कन कॉलेजचे उपकुलपती डॉ. शिंदे म्हणाले की, आपली शिक्षण पद्धती ही परीक्षा केंद्रित आहे. जी ज्ञानाशिवाय पदवीधर तयार करत आहे, याची जाणीव युजीसी आणि केंद्र सरकारला झाली होती. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असून खरी हुशारी, बौद्धिक क्षमता पुढे येण्यासाठी संधी निर्माण करणे गरजेचे आहे, हेही विचारात घेण्यात आले. त्याचा विचार करून निती आयोग अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. इतिहासातील संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील भारताचे स्थान पुन्हा प्राप्त करायचे आहे. भारत शैक्षणिक क्षेत्रात सर्वात पुढे असेल, असे चित्र लवकरच पाहता यावे यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. इयत्ता 5 वी ते 12 वी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात सुरू करण्यात आला आहे. यासाठी वार्षिक एक हजार इतके शुल्क भरून 'इनोव्हेशन हब' चे सदस्यत्व मिळवता येईल.

या उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून पुण्यातील डेक्कन कॉलेजचे उपकुलपती डॉ. व्ही. एस. शिंदे, दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंग आणि नेहरू विज्ञान केंद्र मुंबईचे संचालक एस. एम. खेनेड आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details