महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयएनएस हंसा नाविक तळावर भारत-रशिया नौदलाच्या कवायती

आयएनएस हंस नाविक तळावर इंद्र-२०१९ अंतर्गत भारत आणि रशिया नौदलाच्या संयुक्त कवायती सुरू आहेत. दोन्ही नाविक दलांतर्फे मुरगाव बंदरातील सरावाच्या ठिकाणी संयुक्त सराव सुरू आहे.

indo-russian-naval-combined-drills-arrive-in-goa
आयएनएस हंसा नाविक तळावर भारत-रशिया नौदलाच्या कवायती

By

Published : Dec 13, 2019, 11:34 PM IST

पणजी -भारताच्या गोव्यातील आय. एन. एस. हंस नाविक तळावर इंद्रा-२०१९ अंतर्गत भारत आणि रशिया नौदलाच्या संयुक्त कवायती सुरू आहेत. गोवा कमांडिंग एरियाचे फ्लॅग ऑफिसर यांच्यासह भारत आणि रशियाच्या नौदल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

हेही वाचा -गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भारतीय लष्कराचे मेजर जनरल विजय सिंग आणि रशियन शिष्टमंडळातील मेजर जनरल ओत्सेकोव हे सराव शिबिराचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी गोव्यात दाखल झाले. दोन्ही नाविक दलातर्फे मुरगाव बंदरातील सरावाच्या ठिकाणी संयुक्त सराव सुरू आहे. यामध्ये संयुक्त कारावाई कशी करावी, संपर्क, व्युहरचना आखणे, व्यावसायिक व्याख्याने यांच्यासह फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धा दोन्ही देशांच्या नौदलामध्ये खेळवण्यात आल्या.

हेही वाचा -मुलांच्या मनोरंजनासाठी ईफ्फी परिसरात आकर्षक 'चिल्ड्रन व्हिलेज'

ABOUT THE AUTHOR

...view details