महाराष्ट्र

maharashtra

गोव्यात सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन, 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थेचे आवाहन

गोव्यात पणजी येथे सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी युवकांना नाविन्यपूर्ण स्टार्ट-अपद्वारे भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले.

By

Published : Dec 11, 2021, 9:41 PM IST

Published : Dec 11, 2021, 9:41 PM IST

Indian International Science Festival
Indian International Science Festival

पणजी - गोव्यात पणजी येथे सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. “विज्ञान उत्सव” मध्ये सहभागी होण्याचे आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सद्वारे नेतृत्व करण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील तरुणांना आवाहन केले आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गोव्यात पणजी येथे सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF-2021) उद्घाटन करताना युवकांना नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सद्वारे भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की येत्या काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती भारताला जगातील आघाडीचा देश बनण्यासाठी चालना देईल.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) मालिका भारतातील शाश्वत विकास आणि नवीन तंत्रज्ञान विषयक नवकल्पनांसाठी वैज्ञानिक रुची विस्तारण्याच्या भारताच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे. विज्ञान हा केवळ संशोधनाचा विषय राहिला नसून उत्सवाचे रूप धारण केले आहे. तरुणांना विश्लेषणात्मक विचार करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात विज्ञान महोत्सव साजरा करण्याची गरज आहे, असे डॉ. सिंह म्हणाले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवचे (IISF) आयोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भू विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांनी केले आहे. भू विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) ही IISF 2021 चे आयोजन करणारी नोडल एजन्सी आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, विज्ञानभारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details