महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Election 2022 : गोव्यात भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ, 33.3% मते मिळवली - गोवा लेटेस्ट निवडणूक

भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ ( Goa Election 2022 ) झाली आहे. यावेळी भाजपाने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्व 40 जागा ( BJP's vote share in Goa Election ) लढवल्या होत्या. यातील 20 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

Goa BJP
गोवा भाजपा

By

Published : Mar 11, 2022, 12:04 PM IST

Updated : Mar 11, 2022, 1:06 PM IST

पणजी -गोव्यात 20 जागा ( Goa Election 2022 ) जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावेळी भाजपाने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्व 40 जागा लढवल्या होत्या. यातील 20 जागा ( BJP's vote share in Goa Election ) जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

काँग्रेसने 37 जागा लढवल्या आणि 2,22,948 मते मिळवली. पक्षाला 11 मतदारसंघात विजय प्राप्त झाला. कॉंग्रेस बरोबर युती केलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीला (GFP) एका जागेवर समाधान मानावे लागले. पक्षाला 1.84% मते मिळाली.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. मागील निवडणुकीत पक्षाला 11% मते मिळाली होती. मात्र या वर्षी तो आकडा घसरून 7.6 टक्क्यांवर आला आहे. मगोपला एकूण 72,269 मते मिळाली. यामुळे मगोपला 2 जागा जिंकता आल्या.

आम आदमी पार्टी ने दोन जागा जिंकत 64,354 मते मिळवली. तृणमूल काँग्रेस पार्टीने 5.21 टक्के मते मिळवली. रिव्होल्युशनरी गोवान्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्षांसह इतर पक्षांची मते 19.37 टक्के आहेत.

हेही वाचा -Terrible accident in Amba Ghat : आंबा घाटात भीषण अपघात! २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा मृत्यू

Last Updated : Mar 11, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details