पणजी -तुम्ही फक्त मागणी करा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मी पुरवितो, माझ्याकडे फक्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करा, मंजुरी देणे माझे काम असल्याचे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. गडकरी सोमवारपासून (दि.1 नोव्हेंबर) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज गडकरी यांनी आपल्या भाषणांतून दिवंगत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पणजी सरकारला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी हवा तो प्लॅन करा आणि मंजुरीसाठी माझ्याकडे या, असे सांगत गोव्यातील महत्त्वाची शहरे मेट्रोने जोडण्याचा मनोदय गडकरी यांनी व्यक्त केला. लोटलीम-वेरणा या चार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यात गडकरी बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्ग कर्नाटकपर्यंत नेणार
आपल्या भाषणात गडकरी यांनी मनोहर पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा दिला. गोव्यातील विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत 2017 मध्ये सरकार बनविण्यासाठी आपण महत्वाची भूमिका बाजवल्याचेही गडकरी यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग 2022 पर्यंत पूर्ण होऊन तो कर्नाटकपर्यंत नेणार असल्याचे ही ते म्हणाले.