महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Election 2022 : गोवा निवडणुकीतील सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांने निवडून आलेल्या चुरशीच्या लढती - Goa Election 2022

Goa Assembly Election Result : गोव्यात काही ठिकाणी एक हाती मतदारांनी उमेदवारांना निवडूण दिले. तर कुठे-कुठे मतमोजणीचा प्रत्येक टप्पा हा उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. अरेखच्या टप्पात आल्यावर मात्र अनेकांचे ठोके चुकल्याचे पाहायला मिळाले. या खास रिपोर्टमध्ये जाणून घेऊया... सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल...

Goa Election 2022
गोव्यातील चुरशीच्या लढती

By

Published : Mar 11, 2022, 7:47 PM IST

पणजी (गोवा) - गोवा विधानसभेचे निकाल आलेले असून विविध मतदार संघात अत्यंत रंजक अश्या लढती झाल्याच्या पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी एक हाती मतदारांनी उमेदवारांना निवडूण दिले. तर कुठे-कुठे मतमोजणीचा प्रत्येक टप्पा हा उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. अरेखच्या टप्पात आल्यावर मात्र अनेकांचे ठोके चुकल्याचे पाहायला मिळाले. तर काही उमेदवारांना पहिल्या दोन ते तीन टप्प्यातच आपल्या मतदारांचा कल लक्षात आला. या खास रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया... सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल...

  • सर्वाधिक मतांनी निवडून आलेले उमेदवार -

1) पोरीम मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या दिव्या विश्वजित राणे या गोव्यात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. त्यांना 13943 मते मिळाली आहे. त्यांनी आम आदमी पार्टीचे विश्वजित राणे यांचा दारून पराभव केले आहे.

2) गोव्यातील मार्काईम मतदार संघातून महाराष्ट्रवादी गोमंतकचे सुदिन ढवळीकर हे ९ हजार ९६३ मतांच्या फरकांनी निवडूण आले आहेत. त्यांनी भाजपाचे सुदेश भिंगी यांचा पराभव केला.

3) वाळपोई मतदार संघात भाजपाचे विश्वजित प्रतापसिंह राणे यांनी रिव्ह्यूल्यूशनरी गोवन पार्टीचे तुकाराम भरत परब यांचे 8085 मतांनी पराभव केला.

4) पोर्वोरिम मतदार संघात भाजपाचे रोहन खौंटे यांनी तृणमूल कॉंग्रेसचे संदीप वझरकर यांचा ७ हजार ९५० मतांनी पराभव केला.

5) मरगाव मतदार संघात कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांनी भाजपाचे उपमुख्यमंत्री आजगावकर मनोहर (बाबू) यांचा ७ हजार ७९४ मतांनी पराभव झाला आहे.

  • सर्वात कमी मतांच्या फरकाने निवडून आलेले उमेदवार -

1) सेंट आंद्रे या मतदार संघाचा निकाल हा खूप रोमांचक पद्धतीने लागला आहे. विजयासाठी भाजपा उमेदवार आणि क्रांतीकारी गोवा पक्षाने देव पाण्यात ठेवले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या अटीतटीच्या सामन्यात भाजपाचे फ्रान्सिस्को सिल्वेरा यांचा क्रांतिकारी गोवा पक्षाचे वीरेश मुकेश बोरकर यांनी अवघ्या 76 मतांनी पराभव केला आहे. बोरकर यांना 5395 मते पडलेली आहेत.

2) फोंडा मतदारसंघात सर्वात अटीतटीचा सामना हा महाराष्ट्रवादी गोमंतक आणि भाजपा उमेदवारात झाला आहे. येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार केतन प्रभू भाटीकर यांना 7437 तर भाजपाचे रवी नाईक यांना 7514 मते पडली आहेत. भाटीकर यांचावर भाजपाचे नाईक यांनी अवघ्या 77 मतांनी विजय मिळवला आहे.

3) प्रिओल मतदार संघात भाजपा उमेदवार गोविंद शेपू गावडे यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पांडुरंग उर्फ ​​दीपक ढवळीकर यांचा 213 मतांनी पराभव केला. गावडे यांना 11019 पडलेली आहेत.

4) नावेलिम या मतदार संघात भाजपा उमेदवार उल्हास तुएनकर यांनी तृणमूल काँग्रेसचे वलंका नताशा आलेमाओ यांना 430 मतांनी हारवले आहे.

5) बिचोलिम येथील अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्टे आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नरेश राजाराम सावल यांच्यात चांगलीच काट्याची टक्कर झाली. निवडणुकीच्या अटीतटीच्या सामन्यात सावल यांनी 456 मतांनी पराभूत करत शेट्टे यांनी विजय मिळवला आहे.

  • 1000 मतांच्या फरकाने जिंकलेले आणि हारलेले उमेदवार (पक्ष निहाय)

मतांचा फरक

विजयी पक्ष/संख्या फरकाने हारलेले पक्ष / संख्या
0 ते 1000 भाजपा - 6 कॉंग्रेस - 3
अपक्ष - 1 तृणमूल कॉंग्रेस - 1
महाराष्ट्रवादी गोमंतक -1 अपक्ष - 1
रिव्ह्यूल्यूशनरी गोवन पार्टी- 1 महाराष्ट्रवादी गोमंतक - 3
आप - 1 भाजपा - 2
एकूण 10 10

हेही वाचा -Goa Election 2022 : जाणून घ्या, गोव्यात सर्वात कमी मतांच्या फरकांनी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल; VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details