पणजी- गोवा विद्यापीठ विद्यार्थी कार्यकारी समितीसाठी शुक्रवारी घेण्यात येणारी निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाने कुलगुरू डॉ. वरुण सहानी यांना तासभर घेराव घालत शुक्रवारीच निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी निवडणूक समितीसमोर चर्चा करून 26 ऑगस्टला निवडणूक घेण्याचे मान्य करण्यात आले.
विद्यार्थी मंडळाची निवडणूक ढकलली पुढे गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी समितीसाठी होणारी निवडणूक रद्द केल्याची सूचना विद्यापीठाने जाहीर करताच भाजयुमोने कुलगुरू प्रा. वरुण सहानी यांना घेराव घालत निवडणूक का? रद्द केली हे सांगण्याची मागणी केली. तेव्हा एका विद्यार्थ्याने निवडणूक प्रक्रियेतून आपला अर्ज बाद का बाद झाला? असा सवाल विचारला होता. त्यामुळे त्यामुळे त्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्यापिठाने सांगितले.
कुलगुरूंनी समजावून सांगितल्यानंतरही विद्यार्थी बराच वेळ त्यांच्याशी वाद करत होते. त्यानंतर निवडणुकीची नवी तारीख द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर बंद दरवाजामध्ये बैठक पार पडली. यावेळी भाजयुमोचा अध्यक्षपदाचा उमेदवार खेमुल शिरोडकर यांने आपली बैठक सकारात्मक झाली असून कुलगुरुंनी आपले म्हणणे ऐकून घेतले. तसेच 26 ऑगस्टला निवडणूक घेण्याचे मान्य केले, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक दत्तेश परूळेकर म्हणाले, संबंधित महाविद्यालयाने योग्य कागदपत्रे न दिल्याने एका विद्यार्थ्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यावर त्याने आज विद्यापीठाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे त्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक स्थगित अथवा रद्द करावी लागते. त्यामुळे कुलगुरू यांनी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक रद्द करण्यात आली आहे. शिवाय ही संपूर्ण प्रक्रिया या महिन्यात पूर्ण करण्यात येईल.