पणजी - गोव्याचे शेतीव्यावसायासाठी एकूण जीडीपीच्या केवळ 5 टक्केच योगदान आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यासाठी प्रदेश सरकार सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे. शेतीसाठी युवकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हेही वाचा -नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी संकटात - कृषी अर्थतज्ञ डी. नरसिंह रेड्डी
काल नाबार्डने आयोजित केलेल्या 'स्टेट क्रेडिट सेमिनार'च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सावंत म्हणाले, 2025 पर्यंत स्वयंपूर्ण गोवा, हे सरकारचे अभियान आहे. शेतीव्यावसायासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करायला सरकार तत्पर आहे. शेती सहकार्याबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन आणि सेंद्रिय शेती यांना प्राधन्य देण्यात येत आहे. याकरिता नाबार्डचे मोठे सहकार्य मिळत आहे. याचे सरकार स्वागत करत आहे.
युवकांनी नव तंत्रज्ञान वापरावे
स्वयंपूर्ण गोव्यासाठी गोमंतकीयांनी शेतीकडे लक्ष द्यावे. युवकांनी शेतीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करावा. स्थानिक उत्पादकांचा माल खरेदी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवनिर्मिती आणि स्थानिक उत्पादनांचा विकास आवश्यक आहे. हेच गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी लाभदायी ठरणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, आज शेतकरी सन्मान दिनानिमित्त सावंत यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना आदरांजली वाहिली. तसेच, आपल्या ट्विटमध्ये, आजचा दिवस हा अथक परिश्रमाने आम्हाला अन्न उपलब्ध करणाऱ्या खऱ्या हिरोंना समर्पित आहे. गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी गोवा सरकारचे शेती व्यावसायात परिवर्तन आणण्याचे ध्येय असल्याचे सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा -'कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून स्वागत'