पणजी - गोव्यात यापुढे कोणत्याही प्रकारची आणि कोठेही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास 112 या एकाच क्रमांकावर संपर्क साधल्यास आवश्यक ती मदत उपलब्ध होणार आहे. गोवा पोलिसांनी तयार केलेल्या या आपत्कालीन संपर्क क्रमांकाची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आली.
'इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम' लोगो पणजी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग, पोलीस अधीक्षक परमादित्य आदींसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथम क्रमांक सुरू केला. त्यानंतर या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या पोलीस गाड्यांची पूजा करून हिरवा झेंडा दाखवला.
गोव्यात इमर्जन्सी 'रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम'ची सुरुवात हेही वाचा - IFFI 2019: गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव
यानंतर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गृहखात्याच्या सहकार्याने 'इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम'द्वारे सर्व आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एकच क्रमांकावरून सेवा दिली जाणार आहे. याआधी पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, महिला आणि मुलांवरील अत्याचार विभागाशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळे क्रमांक डायल करावे लागत होते. मात्र, आता 112 या क्रमांकामुळे कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी 112 क्रमांक डायल केल्यावर ती मदत तत्काळ पुरवण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सेवेमुळे राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी पणजी आणि मडगावमध्ये सहय्यता केंद्र असून ज्याला मदतीची गरच आहे त्याला जवळील पोलिसांकडून मदत दिली जाणार आहे.
या सेवेमुळे किनारी भगात पर्यटकांना देण्यात येणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होईल. तसेच पर्यटकांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहे. कारण, यामध्ये दूरध्वनी क्रमांक आणि तो ज्याचा नावावर आहे त्याचे नावही दिसणार आहे. आपत्कालीन सेवेसाठी पाठविलेली पोलीस व्हॅन कोठे पोहचली अथवा दुसरीकडे वळली असेल तर, ते क्षेत्रही दिसणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा - गोएअरच्या ५ ऑक्टोबरपासून १२ मार्गांवर विमान सेवा वाढणार