महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Michael Lobo Join BJP : गोव्याचे विरोधी पक्षनेते 11 आमदारांसह करणार भाजपात प्रवेश? - Goa Opposition leader

गोव्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Opposition Leader Michael Lobo ) आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा ( Michael Lobo resignation possibility )देऊन येत्या एक ते दोन दिवसात भाजपात जाण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसचे 11 आमदार असून त्यातील दोन तृतीयांश आमदार ( two-thirds of Congress MLAs ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मात्र असे न झाल्यास विरोधी पक्षनेते मायकल लोगो आपली पत्नी व अन्य एक दोन आमदारांना घेऊन भाजपा जातील. लोगो यांच्यासोबत त्यांची पत्नी दिलायाला लोबो, केदार नाईक यांचा भाजपा जाण्याचा मनोदय आहे.

Opposition Leader Michael Lobo
राज्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो

By

Published : Jul 9, 2022, 5:16 PM IST

पणजी -गोवा राज्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Opposition Leader Michael Lobo ) आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा ( Michael Lobo resignation possibility )देऊन येत्या एक ते दोन दिवसात भाजपात जाण्याची शक्यता आहे. यासाठी ते आपल्यासोबत आपल्या समर्थक आमदार किंवा काँग्रेसच्या दोन तृतीयांश आमदारांचा गट घेऊन भाजपात प्रवेश करण्याची शक्यता ( possibility join BJP with supportive MLAs ) आहे.

काँग्रेसच्या गोटात चिंतेचा वातावरण - राज्यात सध्या काँग्रेसचे 11 आमदार असून त्यातील दोन तृतीयांश आमदार ( two-thirds of Congress MLAs ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मात्र असे न झाल्यास विरोधी पक्षनेते मायकल लोगो आपली पत्नी व अन्य एक दोन आमदारांना घेऊन भाजपा जातील. लोगो यांच्यासोबत त्यांची पत्नी दिलायाला लोबो, केदार नाईक यांचा भाजपा जाण्याचा मनोदय आहे. मात्र या तिन्ही आमदारांनी राजीनामा दिला तर पुन्हा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. म्हणून काँग्रेसमधले दोन तृतीयांश आमदारसोबत नेण्याचा लोबो यांनी प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ( Former CM Digambar Kamat ) हे देखील भाजपा प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राज्यात हालचालींना वेग आला आहे.

उरली सुरली काँग्रेस वाचवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न सुरू - अकरा आमदार असणाऱ्या काँग्रेसचे मायकल लोबो हे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र लोबो आपल्या सोबत अन्य सहा ते सात आमदारांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात काही जणांना होकार आहे. तर काहीजण द्विधा अवस्थेत आहेत. त्यामुळे या सर्व घटना रोखण्यासाठी राज्याचे निवडणूक प्रभारी दिनेश गुंडुराव गोव्यात दाखल झाले. असून ते सध्या गोव्यात सर्व आमदारांसोबत प्रत्यक्ष भेटून त्यांची मनधरणी करत आहेत. सोबत दुसऱ्या बाजूने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर देखील या सर्व घटना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

इतिहासाची होणार पुनरावृत्ती -2019मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या ( Congress ) दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी देखील राज्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला होता. आता मायकल लोगो यांनी पुढाकार घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

या फक्त अफवाच -राज्यात या आमदारांच्या भाजप ( BJP ) प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसच्या गोटात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. आपली बाजू सांभाळून नेण्यासाठी या अफवा असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर ( Congress state president Amit Patkar ) यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Pune Devotees go missing in Amarnath : अमरनाथ ढगफुटी.. पुण्यातील आठ भाविक बेपत्ता.. शोध सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details