पणजी -गोवा सरकारतर्फे शुक्रवारी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत अप्रेंटिसशिप पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. गोव्याचे कौशल्ये व विकास मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, संचालक दीपक देसाई, एमएसडीईच्या सहाय्यक सल्लागार सुनिता संघी, गौरव कपूर, कैलाश चंद आदी उपस्थित होते.
गोव्यात उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते अप्रेंटिसशिप पंधरवड्याचा शुभारंभ हेही वाचा... नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा - प्रमोद सावंत
गोव्यात अप्रेंटिसशिप पंधरावड्याचा शुभारंभ
कौशल्य विकासाला प्राधान्य देत खाते आणि उद्योग क्षेत्र यामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यास उद्योग क्षेत्राचेही सहकार्य आवश्यक आहे. गोवा सरकार यासाठी डिसेंबर महिन्यात परिषद घेणार आहे. ज्यामुळे किमान दोन ते अडीच टक्के लोकांना रोजगार मिळेल असे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे यावेळी बोलताना राणे म्हणाले.
हेही वाचा... भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकसित करण्याकडे गोव्याचे लक्ष - राणे
उद्योगामध्ये अप्रेंटिसशिपची सुविधा असली पाहिजे. मात्र कोणत्या उमेदवाराला संधी दिली जावी, यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे राणे म्हणाले. गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यावर आमचा भर आहे. अनेक देशांशी याबाबत बोलने सुरु आहेत. सीआयआय, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या सारख्या संस्थांशी सामंजस्य करार करून त्यांना संचालक मंडळात स्थान देण्यात आले असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले आहे.