पणजी (गोवा) - आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून या चाचण्या करून घ्याव्यात असे आरोग्यमंत्रीनी म्हटले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.
गोव्यात कोरोना चाचण्या वाढविण्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आदेश - Vishwajit Rane on corona tests
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
गोव्यात होते दर दिवशी ४ हजार लोकांची चाचणी
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले की, गोवा राज्यात दर दिवशी ३ हजार ते ४ हजार लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या जातात. सध्या गोव्याचा पॉझिटिव्ह रेट हा आठवड्याला १९ ते २० टक्के आहे. गोव्यातील रुग्ण लवकरात लवकर सापडून यावेत, यासाठी राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत आपण जास्तीत जास्त तपासण्या करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य केंद्रांवर जास्तीत जास्त कोरोना चाचण्या कराव्यात
राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत आरोग्यमंत्री म्हणाले की, कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जास्तीत जास्त कोरोना चाचण्या कराव्यात. यावेळी संवाद साधताना आरोग्य अधिका-यांना कोविड -१९ च्या विरोधात सुरु असलेल्या या लढाईत सरकारने घेतल्या भूमिकेची माहिती दिली. राणेंनी सांगितले यावेळी लसीकरण करण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना तळागाळातील पातळीवर पोहोचण्यास सांगितले आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजनसह बेड उपलब्ध
ते म्हणाले की, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजनसह बेड उपलब्ध करुन देण्यात येण्याची व्यवस्था केली जात आहे. गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील सुविधांव्यतिरिक्त कोरोना बाधित लहान मुलांकरता अर्थात पेडियाट्रिक्ससाठी समर्पित रुग्णालय बांधण्याच्या राज्य सरकारच्या योजनेची माहिती त्यांनी यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना दिली.