पणजी- गोवा सरकारने केंद्राने लागू करण्यापूर्वी अनेक आरोग्य विषयक योजना सुरू केल्या आहेत. यापूढे सर्व्हाइकल कँन्सरला प्रतिबंध करणारी लस शालेय स्तरावर देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. रोटा व्हायरस लसीकरणाचा शुभारंभ त्यांच्य हस्ते करण्यात आला.
शालेय स्तरावर सर्व्हाइकल कँन्सर प्रतिबंधक लस देण्याचा गोवा सरकारचा विचार : विश्वजीत राणे पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य संचालक डॉ. जोश डिसा, डॉ. हेमंत खरनारे, डॉ. वंदना धुमे, डॉ. दूरीन नोरोन्हा साजिद इस्तिया आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर आरोग्य मंत्री राणे यांच्य हस्ते बालकांना लस पाजण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना राणे म्हणाले, गोवा सरकारने आरोग्य क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक राज्य बनविण्यासाठी आम्हाला वेगाने पुढे गेले पाहिजे. यासाठी लोकांच्या सुचनांचे स्वागत आहे. ज्या प्रकारे लहान मुलांना विविध प्रकारच्या लसी दिल्या जातात. तशा प्रकारे सर्व्हाइकल कँन्सरला प्रतिबंध करणारी लस शालेय स्तरावर देण्याच विचार आहे. मात्र, याकरिता अर्थखात्याची मंजुरी आवश्यक आहे. ती मिळविण्याचा प्रयत्न आहे.
जगभरात आरोग्य क्षेत्रात काय चालले आहे आणि आपल्यासमोर काय आव्हाने आहेत हे डॉक्टरांनी समजून घेतले पाहिजे, असे सांगून राणे म्हणाले, याकरिता गोव्यातील काही डॉक्टरना अभ्यासासाठी विदेशात पाखवणे आवश्यक आहे. ज्यामुळे जगभरात काय समस्या आहेत हे त्यांना समजून घेता येईल.
डॉ. डिसा यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.