पणजी-कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे गोव्यात अडकून पडलेल्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यासाठी गोवा सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने26 एप्रिलपर्यंत 6117 पर्यटकांना मायदेशी पाठविले आहे.
गोव्यातून 6117 विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवले; इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटलीचे होते नागरिक - foreign travellors
24 मार्च ते 26 एप्रिल 2020 या काळात 6117 विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. यामध्ये इंग्लंडमधील 2339, रशियाचे 1173, जर्मनीचे 692, फ्रान्समधील 240 आणि 156 इटलीच्या नागरिकांचा समावेश आहे.
![गोव्यातून 6117 विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवले; इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटलीचे होते नागरिक goa govt send foreigner to their country safely](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7050864-925-7050864-1588567832607.jpg)
गोव्याच्या विदेशी नागरिक शाखेचे (फॉरेनर्स ब्रँचचे) पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च ते 26 एप्रिल 2020 या काळात 6117 विदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. यामध्ये इंग्लंडमधील 2339, रशियाचे 1173, जर्मनीचे 692, फ्रान्समधील 240 आणि 156 इटलीच्या नागरिकांचा समावेश आहे.
विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी संबंधित देशांच्या दूतावासांशी समन्वय साधून विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवणे पूर्ण होईपर्यंत केंद्रीय ग्रुहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार सर्व शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.