महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 2, 2020, 11:15 AM IST

Updated : Jan 2, 2020, 12:27 PM IST

ETV Bharat / city

'संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आवश्यक'

सागरी असो अथवा कृषी क्षेत्रात संशोधन होण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करावी लागणार आहे, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले.

बोलताना गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक
बोलताना गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक

पणजी- सागरी असो अथवा कृषी क्षेत्रात संशोधन होण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होईल. शिक्षण क्षेत्रात जर खर्च केला नाही तर दर्जेदार शिक्षण कसे मिळेल. त्यामुळे विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी लागणार, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (दि. 1 जाने.) दोनापावला येथे केले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या 54 व्या स्थापनादिन कार्यक्रमात 'सागर विज्ञान आणि समाज' या विषयावर ते बोलत होते.

बोलताना गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक


पुढे बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे ' समुद्र मंथन' आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून आम्ही समुद्राच्या गर्भाशयात काय दडले आहे, याच्याशी जोडले गेलो आहोत. समुद्र जमिनीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. कारण 36 टक्के पेट्रोलियम पदार्थ, 28 टक्के वायू आणि 80 टक्के व्यापार या माध्यमातून होत आहे. समुद्री संशोधन देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. परंतु, प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.


जगाच्या तुलनेत आपल्याकडे नोबेल पारितोषिक विजेते केवळ 12 आहेत. ज्यामध्ये 6 विदेशी आहेत, असे सांगून मलिक म्हणाले, असे घडत आहे. कारण वैज्ञानिक संशोधन, शिक्षण क्षेत्रात आवश्यक प्रमाणात गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण आहे. केलेले संशोधन शेतकरी, लोका यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. भविष्यात देशाची ताकद सेन्यबळावर नव्हे तर अन्नधान्य उत्पादनावर ठरेल.


तसेच आपल्या समोरील मोठी अडचण आहे की, आम्ही कोणतेच नवे उत्पादन घेतलेले नाही, असे सांगून मलिक म्हणाले, सागरी संशोधन देशाची संपत्ती वाढवू शकते. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापावलचे संचालक प्रा. सुशीलकुमार सिंह यांनी प्रास्ताविक आणि राज्यपालांचा उपस्थितांना परिचय करून दिला. या व्याख्यानासाठी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Jan 2, 2020, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details