पणजी -गोव्यात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळणे कठीण होत आहे. यावर उपाय म्हणून मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुरगांव तालुक्यातील चिखली येथील काँटेज रुग्णालय गोव्यातील खासगी डॉक्टरांना चालवण्यासाठी देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
मिरामार येथील खासगी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर अधिक ताण पडत आहे. दक्षिण गोव्यात रुग्णालय नाही. त्यामुळे मडगाल येथील जिल्हा रुग्णालयात सरकारी-खासगी भागिदारीतून वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. याबरोबर त्यासाठी आवश्यकता भासल्यास 10 एकर जमीन सरकार देणार आहे. यामुळे आरोग्य सुविधांबरोबर डॉक्टरांची संख्याही वाढणार आहे. चिखली येथील काँटेज रुग्णालय चालवण्यासाठी काही खासगी डॉक्टर तयार आहेत. सरकार त्याचाही विचार करत असून मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे सर्व जरी आम्ही करत असलो तरी याचा अभ्यास केंद्रीय नीती आयोगाने केलेला आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - जगाला आकर्षित करण्यासाठी धनापेक्षा धारणा बदलणे आवश्यक - प्रल्हाद पटेल
केंद्रीय सचिव प्रीती सुदन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली होती. तेव्हा येथील महिला आणि बाल कल्याण विभागाचे कामकाज पाहून त्यांनी 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे सांगून राणे म्हणाले, यामधून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आई आणि बालक यांच्यासाठी अत्याधुनिक विभाग सुरू केला जाणार आहे.
गोव्यात 'एम्स' साठी प्रयत्न -