पणजी - गोव्याचा विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, आता सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे, ती सत्ता स्थापनेची. भाजपा अपक्षांच्या मदतीने सलग तिसऱ्यांदा गोव्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यातच आता मंगळवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार ( Goa Newly Elected Mla Oath ) आहे.
गणेश गावकर हंगामी अध्यक्ष
राज्यात सत्ता स्थापन होण्यापूर्वी राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकरांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते शपथ दिली जाणार आहे.