महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Election 2022 : "भाजपाने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारले हे त्यांचे दुर्दैव" - उत्पल पर्रिकर यांचा भाजपाचा राजीनामा

उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष लढणार असल्याची घोषणा ( Utpal Parrikar Independent Candidate In Goa Election ) केली आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Utpal Parrikar
Utpal Parrikar

By

Published : Jan 22, 2022, 4:25 AM IST

पणजी - गेली 30 वर्षे आपले वडील स्वर्गीय मनोहर पर्रिकर ( Former Cm Manohar Parrikar ) पणजीतून निवडणूक लढवत होते आणि त्यात विजयी पण झाले. त्यांनी पणजीचा विकास करत असताना गोव्याचा नावलौकिक वाढवला. म्हणून, पणजी मतदारसंघाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांचे समर्थक या मतदारसंघात आहेत, त्यामुळे त्यांचा वारसा चालवण्यासाठी आपण पणजीतूनच निवडणूक लढवण्याची घोषणा उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar Independent Candidate ) यांनी केली.

माजी मुख्यंत्री दिवगंत मनोहर पर्रिकर हे हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंबीय भाजपचाच एक भाग आहेत. भाजप त्यांना आपलेच कुटुंब मानतो. मात्र, उत्पल पर्रिकर यांना आताच्या घडीला पणजीतून उमेदवारी मिळणे शक्य नाही. उत्पल पर्रिकर यांना डिचोलीतून तसेच भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. पर्रिकरांना पाच वर्षांनंतर पुन्हा पणजीत आणू, अशी ऑफर भाजपाचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस दिली ( Goa Election On Devendra Fadanvis ) होती. मात्र, शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्रिकर समर्थक यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

फार मोठा अन्याय

मागील कित्येक वर्षापासून पणजी मतदारसंघात मनोहर पर्रिकर यांचे कार्य सुरु होते. आपण त्यांना पाहून राजकारणाचे धडे गिरवले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचा खरा राजकीय वारसदार उत्पलच आहे. मात्र, भाजपाने त्यांना तिकीट नाकारून फार मोठा अन्याय केल्याचे त्यांचे समर्थक नीना नाईक यांनी सांगितले.

भाजपाने तिकीट नाकारले हे त्यांचे दुर्दैव

पणजीकरांना उत्पल पर्रिकर सारखा एक क्लीन चेहऱ्याचा उमेदवार मिळाला आहे. पणजीकर खूप शिकलेले आहेत. त्यांना काय चांगले काय वाईट हे कळते. ते निवडणूकीच्या निकालातून दिसेल. उत्पलला भाजपाने तिकीट नाकारले हे त्यांचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ आजगावकर यांनी दिली.

हेही वाचा -Goa Election 2022 : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांची भाजपाला सोडचिठ्ठी

ABOUT THE AUTHOR

...view details