महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - dgp pranab nanda demise

गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महासंचालक प्रणब नंदा

By

Published : Nov 16, 2019, 10:09 AM IST

Updated : Nov 16, 2019, 11:25 AM IST

पणजी -गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे शनिवारी (16 नोव्हेंबर)ला मध्यरात्री दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 17) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोवा पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

हेही वाचा - 'साहेब..लेकरासारख्या बागा वाढवल्या अन् होत्याचं नव्हतं झालं'

नंदा यांनी माजी पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांच्याकडून यावर्षी 1 मार्च ला गोव्याच्या महासंचालकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

नंदा यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसल्याचे ट्वीट गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. तसेच त्यांनी नंदा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले आहे. नंदा यांच्या पत्नी सुंदरी नंदा या देखील आयपीएस अधिकारी आहेत. तसेच त्यांना एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा - 'राफेल'ची सीबीआय आणि संसदीय समितीकडून चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

Last Updated : Nov 16, 2019, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details