पणजी -जेव्हा भारत-पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र बनले. पण भारत 'हिंदूराष्ट्र' बनले नाही. कारण आपल्या देशात सर्व जाती -धर्माचे लोक एकत्र राहिले. भारत हा सहिष्णु देश बनला, असे मत गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावर व्यक्त केले. गोवा विधानसभेत सीएए अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.
सोमवारपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी शून्य प्रहर कालावधीत सत्ताधारी भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्याला विरोध म्हणून विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सत्रात यावर सुमारे अडीच तास चर्चा झाली.