महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्मार्टसिटीसाठी केलेल्या खर्चाची भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी श्वेता पत्रिका काढावी - काँग्रेस

गोव्याचे मुख्यमंत्री कारवारमधील युवकांना रोजगार देणार असे म्हणतात. मात्र, येथील युवकांना रोजागार हा आमचा प्राधान्यक्रम नाही, असे सांगून निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत.

By

Published : May 1, 2019, 3:19 AM IST

पत्रकार परिषदेत बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर

पणजी- गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराचा 'स्मार्टसिटी' बनण्याऐवजी होता त्याहूनही दर्जा घसरला. मात्र, या प्रकल्पाचे संचालक असलेले भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा भ्रष्टाचार 'स्मार्ट' झाला. त्यामुळे या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खर्चाची 'श्वेत पत्रिका' काढून पणजीवासीयांना माहिती द्यावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर

काँग्रेस भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक म्हणून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नियुक्ती करण्याचे निकष काय? हे लोकांना सांगितले गेले पाहिजे. केवळ तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जवळची व्यक्ती असल्याने ही नियुक्ती करण्यात आली. २०१५ मध्ये या प्रकल्पासाठी ६ हजार २०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, याचा योग्य उपयोग करण्यात कुंकळ्येकर अपयशी ठरले. असा अपयशी व्यक्ती भाजपने पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार दिला आहे. परंतु, काँग्रेसची मागणी आहे की, त्यांनी स्मार्ट सिटीचे पैसे कुठे आणि कसे वापरले हे पणजीवासीयांना समजले पाहिजे. यासाठी कुंकळ्येकर यांनी खर्चाची श्वेतपत्रिका काढावी. यासाठी काँग्रेस पुढील तीन दिवस वाट पाहील. अन्यथा इतर प्रकरणेही पुराव्यासह लोकांसमोर मांडली जातील.

स्मार्ट सिटी प्रकल्पाने पणजीला मागे नेले आहे. येथील युवकांसमोर रोजागाराचा मोठा प्रश्न आहे. सोमवारी कुंकळ्येकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रोजगाराला आमचा प्राधान्यक्रम नसल्याचे म्हटले होते. त्याचा काँग्रेस तीव्र निषेध करत आहे, असेही चोडणकर म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री कारवारमधील युवकांना रोजगार देणार असे म्हणतात. मात्र, येथील युवकांना रोजागार हा आमचा प्राधान्यक्रम नाही, असे सांगून निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत. वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांनी युवकांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे चोडणकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details