महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

"गोव्यातील डबघाईला आलेल्या पर्यटन उद्योगाला सरकारने नुकसान भरपाई द्यावी" - goa latest news

सध्या व्यवसाय नाहीच. कोणाला आर्थिक प्राप्ती होत नाही. परंतु, मागच्या वर्षीची अनामत रक्कम गोवा पर्यटन विकास महामंडळाने अद्यापही परत केलेली नाही. पुढच्या वर्षी शँक्स उभारणे शँक्स मालकांना शक्य होणार नाही, असे सांगत फर्नांडिस यांनी सरकारने शँक्स मालकांचे शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे.

goa congress demands Compensation for shops owner related to tourism business
गोव्यातील डबघाईला आलेल्या पर्यटन उद्योगाला सरकारने नुकसान भरपाई द्यावी: काँग्रेस

By

Published : Mar 17, 2020, 2:34 AM IST

पणजी - गोव्यातील पर्यटन उद्योग आधीच आर्थिक मंदीचा सामना करत आहे. आता त्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरकारने किमान यावर्षीचे कर्ज माफ करावे, अशी मागणी आज गोवा काँग्रेसने केली आहे.

गोव्यातील डबघाईला आलेल्या पर्यटन उद्योगाला सरकारने नुकसान भरपाई द्यावी: काँग्रेस
पणजीतील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे ठप्प व्यवसाय सावरण्यासाठी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पाऊल उचललेले नाही. तर, दुसऱ्या बाजूने वस्तू आणि सेवा कर अधिकारी वसुलीसाठी शँक्सच्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यटन उद्योग सावरण्यासाठी ज्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण अवलंबितांसाठी सवलत, आर्थिक मदत दिली होती. तसेच बँकांनाही निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आता पावले उचलावीत, असे पक्षाचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडीस यावेळी म्हणाले.

सध्या व्यवसाय नाहीच. कोणाला आर्थिक प्राप्ती होत नाही. परंतु, मागच्या वर्षीची अनामत रक्कम गोवा पर्यटन विकास महामंडळाने अद्यापही परत केलेली नाही. पुढच्या वर्षी शँक्स उभारणे शँक्स मालकांना शक्य होणार नाही, असे सांगत फर्नांडिस यांनी सरकारने शँक्स मालकांचे शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री लोकांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी एकत्र जमू नये म्हणून आदेश काढतात. पण, स्वतः मात्र प्रचारसभा घेऊन गोमंतकीयांना खोटी आश्वासने देत आहेत. उत्तर गोव्यात उभारले जात असलेल्या मोपा विमानतळावर गोमंतकीयांना विशेषतः पेडणे तालुक्यातील लोकांना 100 टक्के रोजगार देणार असे सांगितले. हा आचारसंहितेचा भंग आहे. 2012 च्या निवडणुकीत भाजपनेते मनोहर पर्रीकर यांनी 50 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? किती लोकांना नोकऱ्या दिल्या हे सरकारने आधी सांगावे, असे म्हणत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details