महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा माईल्स अॅपबेस्ड टॅक्सी सेवेमागे भाजपचा छुपा अजेंडा; गोवा प्रदेश काँग्रेसचा आरोप - गोवा प्रदेश काँग्रेस

सरकारने पुण्यातील कंपनीला गोव्यातील टॅक्सी व्यवसाय देण्यामागे भाजपचा छुपा अजेंडा आहे. या अॅपबेस्ड सेवेच्या माध्यमातून सरकार गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय संपवत आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आला.

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर

By

Published : Aug 8, 2019, 8:01 AM IST

पणजी- गोव्याच्या नावाने अॅप तयार करत परराज्यातील कंपनी गोव्यातील टॅक्सी व्यवसाय पळवत आहे. यामागे भाजप सरकारचा कधीही निधी मिळविण्याचा छुपा अजेंडा आहे. त्यामुळे सरकारने याऐवजी गोवा इलेक्ट्रीक लिमिटेडडून शास्त्रीय माहितीच्या आधारे अॅप बनवावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, आमचा अॅपबेस्ड सेवेला विरोध नाही. सरकारने पुण्यातील कंपनीला गोव्यातील टॅक्सी व्यवसाय देण्याचे कारण काय याचा शोध घेतला तर यामागे भाजपचा छुपा अजेंडा आहे. कॅसिनो, अमलीपदार्थ यानंतर 'गोवा माईल्स' हे सरकारसाठी एटीएस बनले आहे. या अॅपबेस्ड सेवेच्या माध्यामातून सरकार गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय संपवत आहे. परंतु, याचे दर हे स्थिर राहणार की बदलते हे स्पष्ट करावे.

हे अॅप कमी काळात गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय संपविणार तर भविष्यात आपल्या भाडे दरात वाढ करणार. त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की, सरकारने गोवा इलेक्ट्रॉनिक या सरकारी कंपनीकडून शास्त्रीय आधारावर आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन 'अॅप' तयार करावे. ज्यामुळे याची मक्तेदारी राहणार नाही. त्याबरोबरच गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांनीही नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. तसेच व्यवसायात पारदर्शकता असली पाहिजे, असेही चोडणकर म्हणाले. या पत्रकार परिषदेसाठी पक्ष प्रवक्ते अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details