महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Illegal Bar In Goa : गोवा काँग्रेसचा स्मृती इराणींवर गंभीर आरोप; 'मृत व्यक्तीच्या नावावर रेस्टाँरंट' - smriti irani daughter restaurant goa

गोवा काँग्रेसकडून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी ( Demand Smriti Irani resignation ) गोवा काँग्रेसने शनिवारी सायंकाळी केली आहे. कॅफेला परवानगी देण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने सर्व नियम शिथिल केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर ( Amit Patkar ) यांनी केला आहे. इराणी यांच्या कॅफेची एसआयटीमार्फत चौकशी ( Smriti Irani investigated SIT ) करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

smriti irani amit patkar
smriti irani amit patkar

By

Published : Jul 23, 2022, 10:45 PM IST

Updated : Jul 24, 2022, 9:25 PM IST

पणजी -स्मृती इराणीच्या ( Smriti Irani ) सिलीसोल कॅफे बाहेर गोवा महिला काँग्रेसने ( Goa Congress ) शनिवारी संध्याकाळी आंदोलन करत इराणी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ( Demand Smriti Irani resignation ) केली आहे. इराणी यांच्या कॅफेला परवानगी देण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. इराणी यांच्या या कॅफेचे एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना

अमित पाटकर यांनी सांगितलं की, गोव्यात सीली सोल कॉफे जो स्मृती ईराणींच्या नातेवाईकाचा आहे. याबद्दल त्यांनी माहिती दिली पाहिजे. त्यामुळे स्मृती ईराणी यांनी राजीनामा दिला पाहिजे. एका व्यक्तीने डिसेंबर 2020 मध्ये आधार कार्ड तयार केलं. त्यानंतर जानेवारी 2021 एक्साईज लाईसन्ससाठी प्रस्ताव देतो. गोव्याच्या एक्साईज नियमानुसार लाईसन्ससाठी तुम्हाला रेस्टॉरंट असायला हवे. मात्र, रेकॉर्डवरून मिळालेल्या माहितीनुसार तिथे रेस्टॉरंट नव्हताच. आधी लायसन्स घेतले आणि मग रेस्टॉरंट सुरु केले. हे पहिला घोटाळा आहे. त्यांनी ज्यांच्या नावावर लायसन्स घेतले आहे, तो माणूस 17 मे 2021 मृत झाला आहे. 22 जून 2022 ला त्या माणसाचे भूत येते आणि लायसन्ससाठी अर्ज केला. त्यावरुन सरकारने त्यांना लायसन्स दिले, हा मोठा घोटाळा केला आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला आहे.

हेही वाचा -Anant Geete : '‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा'; अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी अभिनेत्री तिच्या कामामुळे नाही तर तिची मुलगी जोश इराणीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. वास्तविक, स्मृती यांची मुलगी गोव्यात सिली सोल नावाचा कॅफे बार (रेस्टॉरंट) चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस चिकटवली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी (2021) मृत्यू झाला आहे.

काय आहे प्रकरण -गेल्या महिन्यातच बारच्या परवान्याचे नूतनीकरण झाले असताना ही बाब उघडकीस आली. अर्जावर परवानाधारकाची नसून अन्य कुणाची स्वाक्षरी आढळून आली आहे, असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत स्मृतीच्या कन्येवर लायसन्ससाठी फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये हेराफेरीचे आरोप झाले आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. परवाना नूतनीकरण अर्ज 22 जून 2022 रोजी अँथनी डीगम नावाने करण्यात आला होता, तर रेकॉर्डनुसार या व्यक्तीचा मे 2021 मध्ये मृत्यू झाला आहे.

मीडियानुसार, तक्रारदार वकील रॉड्रिग्स यांनी आरटीआयद्वारे या प्रकरणातील कागदपत्रे जारी केली आहेत. वकिलाचे म्हणणे आहे की मंत्र्याची मुलगी आणि कुटुंबीयांनी मिळून उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक पंचायतीने केलेली हेराफेरी सर्वांसमोर उघड झाली पाहिजे. वकिलाचे म्हणणे आहे की अबकारी नियमांनुसार बार किंवा रेस्टॉरंटच्या मालकालाच बार परवाना दिला जातो.

केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी या दोन मुलांची (जोहर आणि जोश) आई आहेत. नुकतेच स्मृती यांचा मुलगा जोहरने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यावेळी स्मृती यांनी मुलाच्या दीक्षांत समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मृती यांच्या छोट्या पडद्यावरील कामाबद्दल सांगायचे तर, टीव्ही क्वीन एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत तुलसीची भूमिका साकारून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या होत्या.

स्मृती इराणी यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर -एक 18 वर्षांची मुलगी, कॉलेजची विद्यार्थिनी... तिची चारित्र्यहनन काँग्रेसवाल्यांनी केले जात आहे. 2014 आणि 2019 मध्ये तिच्या आईने (स्मृती इराणी) राहुल गांधींविरुद्ध अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवली हा तिचा दोष आहे? असा सवाल स्मृती इराणी यांनी काँगेसला विचारला आहे. तसेच माझी मुलगी बेकायदेशीर बार चालवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -Ganesh Festival Mumbai : यंदा मुंबईत धूमधडाक्यात साजरा होणार गणेशोत्सव, १८५ मंडळांना परवानगी; गाईडलाईन्स जारी

Last Updated : Jul 24, 2022, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details