महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Pramod Sawant गोव्यात पुन्हा होणार भाजपच्या मंत्रिमंडळात फेरबदल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

एकीकडे बुधवारी काँग्रेसच्या आमदार आणि भाजपा प्रवेश केला त्याच्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपात प्रवेश केलेल्या आठ पैकी तीन आमदारांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant

By

Published : Sep 15, 2022, 6:48 PM IST

गोवा एकीकडे बुधवारी काँग्रेसच्या आमदार आणि भाजपात प्रवेश केले त्याच्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपात प्रवेश केलेल्या आठ पैकी तीन आमदारांना डॉक्टर प्रमोद सावंत CM Pramod Sawant यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेटबुधवारी सकाळी आठ आमदार आणि भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सकाळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली होती.

गोव्यात पुन्हा होणार भाजपच्या मंत्रिमंडळात फेरबदल

काँग्रेसचे ते आठही आमदार विनाशर्थ भाजपातबुधवारी भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या आठही आमदारांना विनाशर्थ प्रवेश देण्यात आला आहे. कोणत्याही अटी व निर्बंधाशिवाय ते सर्व आमदार भाजपात आले आहे. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना भाजपा प्रवेश दिला असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगत या आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या Goa CM Pramod Sawant मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचेही सावंत पुढे म्हणाले. मात्र राज्यात सध्या काही मंत्र्यांची खाती काढून या आमदारांपैकी काही ना मंत्री बनवण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यपाल ई श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आहे.

बुधवारी भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या आमदारांचं भाजपात विलीनीकरण झाले आहे. काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे 11 पैकी आठ आमदारांनी भाजपात केलेला पक्षप्रवेश हा घटनेला ग्राह्य धरून आहे. त्या आमदाराने आपल्या पाठिंबाचे पत्र विधानसभेला सादर केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिली आहे. जेव्हा राज्यात या घटना घडत होत्या तेव्हा आपण विधानसभा अध्यक्ष दिल्लीत होतो. मात्र बुधवारी रात्री गोव्यात परतल्यानंतर आपण या सर्व प्रकरणाची माहिती घेतली असून या सर्व घटना कायदेशीर रित्या योग्य असल्याचे तवडकर यावेळी म्हणाले.

पैशाच्या जोरावर भाजप काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न पैसा व सत्तेच्या जोरावर भाजप सध्या काँग्रेस व विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोवा काँग्रेस निवडणूक प्रभारी दिनेश गुंडराव यांनी सांगितले. गोव्यात बुधवारी राजकीय घडामोडी घडल्यानंतर राव रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले. दरम्यान या विषयी बोलताना राव यांनी भाजप, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करत राज्यात लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details