पणजी (गोवा) -आम्हाला 20पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, याबाबत आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. ( Goa CM Pramod Sawant Prediction ) यानंतर आज मुख्यमंत्री सावंत यांनी आपले मत मांडले.
14 फेब्रुवारीला गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. ( Goa Assembly Election 2022 ) एकूण 80 टक्के मतदान मतदान झाले. सर्वाधिक मतदान साखळी मतदासंघात झाले. त्याखालोखाल मांद्रे, पेडणे, सांगे, कानकोण, केपेम, मये, मुरंगाव या मतदारसंघात 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यानंतर गोव्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी 10 मार्च 2022 रोजी प्रचंड जनादेश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
दिगंबर कामत- माजी मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस मडगावचे उमेदवार दिगंबर कामत यांनी नमूद केले की, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी आघाडीच्या बाजूने बदल होऊन पुढील सरकार स्थापन होईल, असा मला विश्वास आहे.
मायकल लोबो
मायकल लोबो यांनी माहिती दिली की, ते ज्या पक्षाचा भाग आहेत ते सरकार स्थापन करतील.
उत्पल पर्रीकर