महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पी.चिदंबरम आज गोवा दौऱ्यावर; तर मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाहांची भेट - Pramod Sawant meets Amit Shah

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्याचे निवडणूक प्रभारी पी.चिदंबरम आजपासून पुन्हा एकदा दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आले आहेत या काळात ते राज्यातील नेत्यांशी बोलून गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युतीबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षानेही काँग्रेसला चतुर्थी पर्यंत युतीबाबत निर्णय घेण्याचा अलटीमेंटम दिला आहे.

Goa CM Pramod Sawant meets Amit Shah and P Chidambaram visit Goa
Goa CM Pramod Sawant meets Amit Shah and P Chidambaram visit Goa

By

Published : Sep 4, 2021, 11:05 AM IST

पणजी -मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नुकतीच हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थिती व निवडणुकांविषयी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता भाजपा चाळीसही जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान अमित शाह यांच्या भेटीत राज्यातील निवडणूकविषयी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.

Goa CM Pramod Sawant meets Amit Shah and P Chidambaram visit Goa

चिदंबरम आज घेणार युतीबाबत निर्णय?

माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम आजपासून पुन्हा एकदा दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज आणि उद्या ते राज्यातील विविध मतदारसंघाचे दौरे करणार असून येथील स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील महत्वाच्या मतदार संघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान आज चिदंबरम युतीबाबत काय घोषणा करतात, याकडेच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम आजपासूनदोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

गोवा फॉरवर्ड चा युतीबाबत चतुर्थी पर्यंतचा अलटीमेंटम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केला होता. यात त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाशी काँग्रेस सोबत जाऊन युती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. गोवा फॉरवर्ड पक्ष ही युतीबाबत आग्रही आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशानंतर लगेचच युतीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, काँग्रेसकडून अद्यापही निर्णय राखून ठेवण्यात आला होता. गणेश चतुर्थीच्या अगोदर काँग्रेसने युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असा अलटीमेंटम गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काँग्रेसला दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

पणजीचे माजी महापौर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश -

पणजीचे भाजपा आमदार बाबूश मोन्सरात यांचे खंदे समर्थक व पणजीचे माजी महापौर उदय मडकइकर यांनी नुकताच आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांनी बाबुश यांच्या ताब्यात असणाऱ्या पणजी महानगरपालिका कारभारावर टीका करून नाराजी व्यक्त केली होती. मडकइकर आगामी विधानसभा निवडणूक बाबुश मोन्सरात यांच्याविरोधात लढविणार आहेत.

हेही वाचा -OBC Reservation : राज्य सरकार तयार करणार इंपिरिकल डेटा; सर्वपक्षीय बैठकीत एकमत

ABOUT THE AUTHOR

...view details