पणजी - काँग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास राहिलेला नाही. मतमोजणी जवळ आल्याने केवळ लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. फोन टॅपिंगचा संशय आल्यास त्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करावी असा टोला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी (Pramod Sawant on Congress) काँग्रेसला लगावला आहे.
Goa CM on Congress : 'निवडणुकीआधी काँग्रेसने आपले उमेदवार सांभाळावे' - डॉ. प्रमोद सावंत - Goa CM on Congress
काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषदेत खाजगी एजन्सीमार्फत काँग्रेस नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची पोलीस तक्रार ही विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे दिली आहे. दरम्यान काँग्रेसने निवडणूक निकालाधीच आपला पराभव मान्य केल्याचे दिसत आहे.
![Goa CM on Congress : 'निवडणुकीआधी काँग्रेसने आपले उमेदवार सांभाळावे' - डॉ. प्रमोद सावंत pramod sawant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14644807-thumbnail-3x2-jiha.jpg)
pramod sawant
सदानंद तानावडे माध्यमांशी बोलताना
काँग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास राहिलेला नाही. मतमोजणी जवळ आल्याने केवळ लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. फोन टॅपिंगचा संशय आल्यास त्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करावी असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसला लगावला आहे.
मुख्यमंत्री
मायकल लोबो निवडणुकीनंतर आपले महत्व वाढविण्यासाठी काही नेते उगाचच मोठ्या बाता मारतात. त्यांना भाजपच्या कोणत्याही केंद्रीय नेत्यांनी संपर्क साधला नसल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.
हेही वाचा -Goa Election Murgaon: मुरगावात मिलिंद नाईक हॅटट्रिक साधनार का सगळ्यांनाच उस्सुकता
Last Updated : Mar 14, 2022, 1:00 PM IST