पणजी- राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात मागच्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतांचा जोगवा मागण्यांसाठी भाजपा सरकार सज्ज झाली आहे. त्या दृष्टीने सरकारच्या विविध योजना व केलेली विकासकामे घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या प्रत्येक मतदारसंघात 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम राबवित आहेत.
राज्यात भाजपा सरकारने कोविड काळात अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. त्यातील काही पूर्णत्वास गेली तर काही अपूर्णवस्थेत आहेत. ही प्रलंबित कामे 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे प्रशासन चांगलेच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकतेच गोव्याचा स्वातंत्र्य संग्रामला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे सरकारने 'गोवा@६०' हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत राज्य प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. सोबतच राज्यात प्रलंबित असणारा रोजगार, खाणी पुन्हा सुरू करणे, पर्यटनाला उभारी देणे ही आव्हाने मुख्यमंत्र्यांसमोर आहेत. विरोधीपक्ष ही निवडणुकीमुळे जोरदार आव्हान मुख्यमंत्री व भाजपला देत आहेत. त्यामुळे अनेकवेळा मुख्यमंत्री व विरोधीपक्ष यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगत आहे.
सरकार तुमच्या दारी मात्र नाराज अधिकारीनी कर्मचारी-