महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवीन चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत उघडणार नाहीत चित्रपटगृहे - गोवा चित्रपटगृह सुरू न्यूज

कोरोना प्रादुर्भवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. आता अनलॉक प्रक्रियेमध्ये केंद्र शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, गोव्यातील चित्रपटगृहे मालकांनी त्याला विरोध केला आहे.

cinema hall
चित्रपटगृह

By

Published : Oct 14, 2020, 1:27 PM IST

पणजी -केंद्र सरकारच्या सुचनांनुसार गोवा सरकारने राज्यातील चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांच्या मालकांनी याला विरोध केला आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होत नाहीत तोपर्यंत चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय या मालकांनी घेतला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, पुढील सूचना मिळेपर्यंत कॅसिनो बंद राहतील, असे सांगितले. केंद्र शासनाच्या अनलॉक ५च्या नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये अद्याप चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. गोव्यातही चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांनी घेतला आहे, अशी माहिती भाजपा आमदार आणि ऑल गोवा थिएटर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण झांटे यांनी दिली. गोव्यात ४० स्क्रिन्स आहेत. पणजीतील आयनोनिक्सचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ते पूर्ण झाल्या शिवाय आम्ही ते खुले करणार नसल्याचे 'एंटरटेनमेन्ट सोसायटी ऑफ गोवा'चे(ईएसजी) उपाध्यक्ष सुभाष फलदेसाई यांनी स्पष्ट केले.

सध्या ईएसजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया(इफ्फी)चे आयोजन करण्याची तयारी करत आहे. इफ्फी पुढच्यावर्षी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, असे फलदेसाई यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details