पणजी - गोवा सरकारने आज विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड-19 च्या तयारीच्या प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली आहे. तसेच अनेक प्रशासकीय निर्णयांना मान्यता दिली आहे. यामधील मोठा निर्णय म्हणजे कामगार, कारखाने आणि बाष्पक विभागाच्या कायद्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार बदल करण्यात आले आहेत. पर्वरीतील सचिवालयात पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.
गोवा सरकारने आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक दोन फिजिओथेरपिस्ट आणि दोन रेडिओलॉजिस्ट यांची कंत्राटी पद्धतीने भरती तसेच लेखा विभागात 35 नव्या जागा तयार करून भरण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा वटहुकूम काढण्यात आला आहे. यामध्ये कामगारांना 12 तास काम करावे लागेल ज्यामधील 4 तास हे अतिरिक्त कामचे (ओव्हरटाईम) असतील.
केंद्र सरकारने काही प्रवाशी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 16 मे रोजी दिल्लीहून राजधानी एक्स्प्रेस गोव्यातील मडगाव स्टेशनवर थांबणार आहे. यामधून 500 प्रवाशी गोव्यात येतील. ज्यांची मडगावातील जिल्हारुगणालयात कोविड चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास ज्यांचे घर आहे त्यांना होमकोरनटाईन तर ज्यांची सुविधा नाही. त्यांना सरकारी कोरंटाईनमध्ये रहावे लागेल. या चाचणीसाठी बिगर गोमंतकीयांना 2 हजार रूपये मोजावे लागतील. तर विमानाने येणाऱ्यांची तपासणी विमानतळावर करून त्यानंतर बाहेर सोडले जाईल. जलमार्गाने येणाऱ्यांसाठी अशीच प्रक्रिया असेल, असेही सावंत यांनी सांगितले.