महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यातील बारावीच्या परीक्षांबाबत आज अंतिम निर्णय घेऊ - गोवा मुख्यमंत्री

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल, असे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रमोद सावंत
प्रमोद सावंत

By

Published : Jun 2, 2021, 7:30 PM IST

पणजी (गोवा) - सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल, असे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गोवा मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या प्रलंबित परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी बोर्ड व राज्य शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, की आत्ता आमच्यासमोर तीन सूचना आहेत. एक म्हणजे परीक्षा रद्द करणे, दुसरे म्हणजे गुणांच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करणे, ज्यांना या परीक्षेची निवड करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देणे आणि तिसरे म्हणजे दोन्ही निकाल (अंतर्गत मूल्यांकन व परीक्षा) एकत्र जाहीर करणे, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.

गोवा सरकार इतर राज्यांतील बोर्डाच्या घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करेल आणि संध्याकाळपर्यंत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी सल्लामसलत करेल. त्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करू, असे सावंत यांनी सांगितले. 21 हजार विद्यार्थी बारावीच्या बोर्ड परीक्षेस पात्र आहेत. सीबीएसईने केवळ 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढलेले नाही, म्हणून शिक्षण सचिव या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आज संध्याकाळपर्यंत आम्ही अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट इ. सारख्या उत्तर देणाऱ्या विविध परीक्षांवरही आम्ही विचार करीत आहोत. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निर्णय सर्व बाबींचा विचार करून आज घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details