पणजी -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम गोव्यातील पर्यटन व्यवसायावरही झाला आहे. पर्यटकांनी फुललेले बीच सध्या ओस पडले आहेत. मात्र, या बीचवर जीवनरक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुटी मिळालेली नाही.
पावसाळ्यात जशी परिस्थिती असते, तशी परिस्थिती सध्या गोव्यातील सर्व बीचची झालेली आहे. एखाद दुसरा व्यक्ति आणि काही तुरळक विक्रेतेच बीचवर दिसतात. मात्र, काहीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे जीवनरक्षकांना बीचवर हजर रहावेच लागत आहे, असे कळंगुट-बागा बीचवर काम करणाऱ्या शशिकांत जाधव यांनी सांगितले.