पणजी- अयोध्या वादग्रस्त जमिनीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्ष या निकालाचा आदर करतो. तसेच आम्ही सर्वजण स्वागत करत असल्याचे गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले. काँग्रेस भवनात ते बोलत होते.
अयोध्येबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर - दिगंबर कामत - ayodhya verdict
अयोध्या वादग्रस्त जमिनीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावर गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिगंबर कामत
अयोध्या वादग्रस्त जमिनीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये ही जमीन केंद्राच्या ट्रस्टला देण्यात आली, तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्ये दुसरी ५ एकर जमीन देण्यात आली. त्यामुळे सर्वांनी न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा. तसेच भारतीय संविधानातील निहित धर्मनिरपेक्षता आणि बंधुता यांचे पालन करावे आणि देशात शांती कायम राखावी, असे आवाहन देखील कामत यांनी यावेळी जनतेला केले.