पणजी -गोवेकर हे अतिशय स्वाभिमानी आहेत. त्यांनी आपला स्वाभिमान कोणासमोर विकला नाही. (Goa Assembly Election) त्यामुळे कोणीही पैशाच्या जीवावर गोवेकरांना विकत घ्यायचा विचार करू नये, अशा शब्दांत फडणवीस यांनी तृणमुल काँग्रेस, आपसह काँग्रेस पक्षाचा समाचार घेतला. ते आज गोव्यात अपक्ष आमदार रोहन खवटे यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलत होते.
अपक्ष आमदार रोहन खवटे यांचा भाजपात प्रवेश -
अपक्ष आमदार रोहन खवटे यांनी आज भाजपात (Independent MLA joins BJP in Goa )प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, गोवेकर हे अतिशय स्वाभिमानी आहेत. त्यांनी आपला स्वाभिमान कोणासमोर विकला नाही. त्यामुळे कोणीही पैशाच्या जीवावर गोवेकरांना विकत घ्यायचा विचार करू नये, अशा शब्दांत फडणवीस यांनी तृणमूल, आप व काँग्रेसला टोला लगावला.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग (Independent MLA joins BJP in Goa) सुरू झाले आहे. पर्वरीचे आमदार रोहन खवटे यांनी नुकताच आपल्या अपक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
त्या पक्षाचे नेते व त्यांचा पक्षही पार्ट टाईम काम करतो, फडणवीसांचा काँग्रेसला टोला -
ज्या पक्षाचे नेते पार्ट टाईम राजकारण करतात तो काँग्रेस पक्षही राज्यात पार्ट टाईम काम करतो. म्हणून त्या पक्षाचे आमदार भाजपात प्रवेश करतात, असे म्हणत फडणवीस यांनी आम आदमी पक्ष आणि तृणमुल व काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. गोवेकर स्वाभिमानी आहेत. त्यांनी आपला स्वाभिमान या बाहेरच्या पक्षांना विकला नाही, म्हणून कोणीही खोटी आश्वासने गोवेकारांना दाखवू नयेत, असेही ते म्हणाले.
रोहन खवटे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पर्वरीच्या विकासाला डबल इंजिन लागेल. त्यामुळे, आगामी काळात आमचे वैचारिक मतभेद असूनही आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताने सत्तेत आणण्यासाठी एकत्र आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
विचारधारा बदलणार नाही, केवळ विकासासाठी भाजपप्रवेश - खवटे
दरम्यान विधानसभेत एकमेकांचे कट्टर वैरी असणारे रोहन खवटे यांनी आपण आपली विचारधारा कधीही बदलणार नसून फक्त गोव्याच्या विकासासाठी आपण भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचे खवटे म्हणाले.