महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Assembly Election : 'टूगेदर फॉर साळगाव'च्या झेंड्याखाली भाजपचे निष्ठावंत एकत्र, भाजपाविरोधात थोपटणार दंड - आमदार जयेश साळगावकर यांचा भाजपात प्रवेश

गोवा फॉरवर्डचे (Goa Forward party MLA) आमदार जयेश साळगावकर यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असून 'टूगेदर फॉर साळगाव'च्या झेंड्याखाली हे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

Goa Assembly Election
Goa Assembly Election

By

Published : Dec 6, 2021, 3:10 PM IST

पणजी -गोवा फोरवर्डचे (Goa Forward party MLA) आमदार जयेश साळगाव यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असून टूगेदर फॉर साळगावकरच्या झेंड्याखाली हे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

भाजपविरोधात निवडणूक लढविणार -

टूगेदर फॉर साळगावच्या झेंड्याखाली भाजपचे निष्ठावंत एकत्र आले असून आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) याच झेंड्याखाली लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सर्व कार्यकर्त्यांनी साळगाव मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन आगामी विधानसभेची (Goa Assembly Election ) तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा -Narayan Rane On Devendra Fadnavis : 'मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे... वाया देवेंद्र फडणवीस'

भाजपला बसू शकतो फटका -

टूगेदर फॉर साळगावच्या झेंड्याखाली भाजपचे निष्ठावंत एकत्र आल्याने येथे आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election ) जयेश साळगावकर यांना तिकीट दिले जाऊ शकतं, मात्र या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतल्यास त्याचा भाजपला फटका बसू शकतो. या विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप परुळेकर, सरपंच केदार नाईक, जिल्हा परिषद सदस्य रुपेश नाईक भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, मात्र जयेश साळगावकर यांच्या (Goa Forward party MLA) पक्षप्रवेशने त्यांची तिकिटे कापली गेली आहेत. त्यामुळे टूगेदर फॉर साळगावच्या झेंड्याखाली हे सर्वच नाराज एकत्र आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details