महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग; भाजपची उमेदवार निश्चितीसाठी लगबग तर तृणमूल 'मगो'च्या युतीवर शिक्कामोर्तब - Accelerate political developments in goa

सोमवार सकाळपासून गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने (Alliance of Trinamool Congress and Maharashtra Gomantak Party) युती केल्यावर भाजपच्या (Goa BJP meeting) गोटात 'एकला चलो' चा नारा देण्यात आला आहे.

goa-assembly-election
goa-assembly-election

By

Published : Dec 6, 2021, 9:06 PM IST

Updated : Dec 6, 2021, 9:52 PM IST

पणजी -आगामी गोवा विधानसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवआज सकाळपासून गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने युती केल्यावर भाजपच्या गोटात 'एकला चलो' चा नारा देण्यात आला आहे.

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग
राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू(Goa BJP meeting) -

पणजीतील विवंता हॉटेलमध्ये निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किशन जे. रेड्डी, सी.टी. रवी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या एक दोन दिवसांत भाजपा उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात येणार असल्याचेही बोलले जातेय.

तृणमूल 'मगो'च्या युतीवर शिक्कामोर्तब
तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाची युती ( Alliance of Trinamool Congress and Maharashtra Gomantak Party) -

एकीकडे भाजपा उमेदवार निश्चित करत असताना तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने आपल्या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. मगोचे नेते दीपक ढवळीकर यांनी युतीचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसला दिल्यावर त्यांनी याचा स्वीकार करत याविषयीची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी 13 डिसेंबरला गोव्यात दाखल होणार असून दोन्ही पक्षाच्या वतीने यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 6, 2021, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details