पणजी -गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
- अनेकदा विधानसभा राहिली त्रिशंकू -
प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली.
गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यास भाजप यशस्वी झाले. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पर्रीकर यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले, तरीही त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 17 मार्च 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि भाजप सध्या त्यांच्याबरोबर निवडणूक लढत आहे.
गोव्याच्या राजकीय इतिहासाचा विचार केला असता. 1987 मध्ये गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि प्रतापसिंह राणे हे पहिले गोव्याचे मुख्यमंत्री बनले. प्रतापसिंह राणे असताना तत्कालीन विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने विजय मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण ही विधानसभा केवळ ३ वर्षे चालली. त्यानंतर गोव्यात सहाव्या विधानसभेत 1989 मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यानंतर गोव्यात पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार बनले आणि चर्चिल अलेमाओ मुख्यमंत्री झाले.
- काँग्रेस-AAP ने दिली उमेदवारांना शपथ -
गोवा निवडणूक जसजशी जवळ येईल तशी या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपला गड ढासळण्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. गोव्यात काँग्रेसने भाजपला लागलेली गळती पाहून लगेच सावध पवित्रा घेतला आणि आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या शपथा दिल्या. त्यानंतर गोव्यात आम आदमी पार्टीनेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत, आपल्या सर्व उमेदवारांना न फूटण्याची शपथ दिली आहे. तसेच सर्व उमेदवारांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याचीही माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.
- जातीनुसार गोव्याचे राजकारण -
गोव्याची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार 18.2 लाख आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्यात मतदारांची संख्या ही 11.10 लाख आहे. गोव्यातील एकूण लोकसंख्या पाहता एकूण लोकसंख्येत 35 ते 40 टक्के लोकसंख्या ही भंडारी समाजाची आहे. गोव्यामध्ये ओबीसी समाजामध्ये 19 घटक आहेत. त्यांच्या लोकसंख्येचा विचार केल्यास त्यामध्ये 60 टक्के समाज हा भंडारी आहे. ओबीसी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा घटक आहे. गोव्यात 65 टक्के हिंदू समाज असून 25 टक्के समाज हा ख्रिश्चन आहे. 7 ते 8 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे.
- AAP ने भंडारी समाजाचा चेहरा दिला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार -
'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दिला आहे. गोव्यात 'आप'ची सत्ता आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करण्याची अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेनंतर जातीचे राजकारण आणि व्होट बँकेची चर्चा सुरू झाली. तसेच केजरीवाल यांनी अमित पालेकर यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा देखील केली.
- गोव्यातील जातीय राजकारण -